scorecardresearch

‘गंगूबाई काठियावाडी’नंतर आलिया भट्ट करणार हॉलिवूडमध्ये पदार्पण, चित्रपटाचे नावंही ठरलं!

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित गंगूबाई काठियावाडी हा आलिया भट्टचा नवीनतम चित्रपट प्रेक्षकांनी चांगलाच डोक्यावर घेतला आहे.

गंगूबाई काठियावाडी चित्रपटातील आलियाचा दमदार अभिनय सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. (Photo : Instagram/ @aliaabhatt/@gal_gadot)

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिचा गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात आलियाने प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही दणक्यात कमाई केली. या चित्रपटाला प्रेक्षकांसह समीक्षकांनीही भरभरून दाद दिली आहे. यानंतर आता आलिया एक पाऊल पुढे टाकण्यास सज्ज झाली आहे. आलिया भट्ट ही लवकरच हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

आपल्या अभिनयानं सर्वांचं मन जिंकून घेणारी अभिनेत्री म्हणून आलिया भट्टला ओळखले जाते. आलिया भट्टच्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यामध्ये जगभरात १०० कोटींचा टप्पा ओलांडला होता. यात तिच्या दमदार अभिनयाने तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर आता दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने ९२.२२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे सध्या या चित्रपटाची, त्यातील गाण्याची, डायलॉगची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.

“ते राजा अन् आम्ही…”, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने कपिल शर्माच्या शो वर केले गंभीर आरोप

यानंतर आता आलिया भट्ट हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. नेटफ्लिक्सच्या ‘हार्ट ऑफ स्टोन’मधून आलिया हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. यात ती ‘वंडर वुमन’ स्टार गॅल गॅडोटसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. आलियाचा हा पहिलाच हॉलिवूड चित्रपट असून याद्वारे ती हॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. ‘हार्ट ऑफ स्टोन’ हा चित्रपट एक स्पाय थ्रिलर चित्रपट असणार आहे. यात ‘५० शेड्स ऑफ ग्रे’ या चित्रपटात झळकलेला अभिनेता जेमी डोर्नन देखील असणार आहे.

आलिया भट्टने यापूर्वी अनेक चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. झोया अख्तरच्या “गल्ली बॉय” हा चित्रपट फार हिट ठरला होता. झोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटामध्ये स्वप्नांसाठी धडपडणाऱ्या २६ वर्षीय डिव्हाइन या प्रसिद्ध रॅपरची कथा सादर करण्यात आली होती. रणवीर सिंह आणि आलिया भट्ट यांची भूमिका असलेला हा चित्रपट केवळ देशातच नाही, तर परदेशातही लोकप्रिय ठरला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Alia bhatt will make her hollywood debut after gangubai kathiawadi pvp

ताज्या बातम्या