रणबीर-आलियाच्या ‘ब्रह्मास्त्र’साठी प्रेक्षकांना पाहावी लागेल आणखी वाट

दिग्दर्शक अयान मुखर्जीने सोशल मीडियावर दिली माहिती

ranbir alia
रणबीर- आलिया

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. गेल्या पाच-सहा महिन्यांपासून या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. चित्रपटाची शूटिंगसुद्धा संपली आणि या वर्षाअखेर तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र आता प्रेक्षकांना आणखी वाट पाहावी लागणार आहे. कारण दिग्दर्शक अयान मुखर्जीने चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर टाकल्याचे स्पष्ट केले आहे.

‘‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट २०१९ नाही २०२० मध्ये प्रदर्शित होईल. चित्रपटातील संपूर्ण टीम आणि व्हीएफएक्स टीम ग्राफिक्स आणि साऊंड्सच्या कामात व्यग्र आहे. एक दमदार चित्रपट बनवण्यासाठी टीम दिवसरात्र झटत आहे. या लक्ष्यपूर्तीसाठी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी लागत आहे. २०२० च्या उन्हाळ्यापर्यंत आम्ही हा चित्रपट प्रदर्शित करू. प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाल्यानंतरच तारखेची अधिकृत घोषणा केली जाईल,’ असे अयानने सोशल मीडियावर पोस्ट लिहित स्पष्ट केले आहे.

अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर व आलिया पहिल्यांदा ऑनस्क्रीन एकत्र दिसणार आहेत. तर या चित्रपटात अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय हेही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. ‘ब्रह्मास्त्र’ यावर्षी नाताळच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला असता तर सलमान खानच्या ‘दबंग ३’ आणि अक्षय कुमारच्या ‘गुड न्यूज’ या दोन चित्रपटांशी त्याची टक्कर अटळ होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Alia ranbir starrer brahmastra release postponed

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या