‘गंगूबाई काठियावाडी’चं नवं पोस्टर, आलिया भट्टने शेअर केला लूक

30 जुलैला होणार प्रदर्शित

येत्या काही दिवसात अनेक बिग बजेट सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यातच दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या वाढदिवसाचं निमित्त साधत त्यांचा आगामी सिनेमा ‘गंगूबाई काठियावाडी’चं पोस्टर रिलीज करण्यात आलंय. त्याचसोबत सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आलीय. अभिनेत्री आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेला ‘गंगूबाई काठियावाडी’ हा सिनेमा येत्या 30 जुलैला प्रदर्शित होतोय.

आलिया भट्टने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सिनेमाचा फर्स्ट लूक शेअर केलाय. त्याचसोबत प्रदर्शनाची तारीखदेखील जाहीर केलीय. सिनेमाच्या पोस्टरमध्ये आलिया भट्ट अगदी हटके लूकमध्ये दिसतेय.संजय लीला भन्साळी यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. हा सिनेमा हुसैन जैदी यांच्या ‘माफिया क्विन ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित आहे. तर सिनेमामध्ये आलिया भट्ट गंगूबाईची मुख्य भूमिका साकारणार आहे. त्याचसोबत सिनेमामध्ये अजय देवगण आणि विक्रांत मेसी यांची महत्वाची भूमिका पाहायला मिळेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt)

मुंबईतील रेड लाईट एरिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कामाठीपुरात दबदबा असणाऱ्या ‘गंगूबाई’ ची ही कथा आहे. गंगूबाई काठियावाडी मुळची गुजरात मधील काठियावाड इथं राहणारी होती. यावरुवच तिचं नावं गंगूबाई काठियावाडी असं पडलं. कामाठिपुरातील वैश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी गंगूबाईंनी कायम आधार दिला. तर कुख्यात गुंड करिम लाला याला गंगूबाईनं भाऊ मानंलं होतं. त्यामुळे संपूर्ण कामाठिपुरात तिचा मोठा दबदबा होता.
याचं गंगूबाईच्या आयुष्यावर आधारित सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमामुळे आलिया भट्टला पुन्हा एकदा एक वेगळी भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. हायवे, उडता पंजाब, राझी आणि गली बॉय या सिनेमांमधून आलियाने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Aliaa bhatt shares gangubai kathiyawadi movie poster and annoused release date kpw