अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टार ‘पुष्पा २’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी ‘पुष्पा २’ चा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. या टीझरला प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळाली होती. मात्र, सध्या ‘पुष्पा २’ चित्रपटाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. ‘पुष्पा २’ च्या कलाकारांच्या बसला अपघात झाला आहे. या अपघातात दोन कलाकार जखमी झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिळालेल्या माहितीनुसार ‘पुष्पा २’ चे कलाकार शूटिंग संपवून आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातून हैदराबादला परतत होते. तेलंगणातील नालगोंडा जिल्ह्यात बसला अपघात झाला. कलाकारांना घेऊन जाणाऱ्या बसने हैदराबाद-विजयवाडा महामार्गावर नरकटपल्लीजवळ थांबलेल्या आरटीसी बसला धडक दिली. या अपघातात दोन कलाकार किरकोळ जखमी झाले आहेत.

हेही वाचा- काय सांगता! प्रदर्शनाच्या आधीच ‘आदिपुरुष’ चित्रपटाने कमावले २०० कोटी, जाणून घ्या कसे?

काही तांत्रिक बिघाड झाल्याने आरटीसी बसचालकाने बस रस्त्याच्या कडेला थांबवली होती. ‘पुष्पा २’ च्या कलाकारांना घेऊन जाणार्‍या बसच्या चालकाने उभी असलेली आरटीसी बस बघितली नाही आणि तिला जोरात धडक दिली. या घटनेत दोन कलाकार जखमी झाले आहेत. जखमी कलाकारांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा- मुकेश अंबानी पुन्हा झाले आजोबा, आकाश व श्लोका अंबानीला कन्यारत्न

“दिग्दर्शक सुकुमार यांनी बॅंकॉक व इतर ठिकाणी या चित्रपटाच्या शूटिंगसाठी टेस्ट शूटचे प्लॅनिंग केले आहे. डिसेंबरमध्ये या चित्रपटाच्या टेस्ट शूटिंगला सुरुवात होणार आहे. त्यानंतर चित्रपटाच्या अंतिम शूटिंगचा विचार करण्यात येणार आहे. दिग्दर्शकाला घाईघाईत शूटिंग संपवून ‘पुष्पा २’ प्रेक्षकांच्या भेटीला आणायचा नाहीय. त्यामुळे २०२४च्या मार्च-एप्रिल महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो,” अशी माहिती चित्रपटाच्या टीममधील व्यक्तीने दिली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Allu arjun and rashmika mandanna pushpa 2 movie cast crew injured after bus accident returning from andhra pradesh dpj
Show comments