‘स्टायलिश स्टार’ अल्लू अर्जुनने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधलंय. आठ महिन्यांची मुलगी आऱ्हासोबतचा अल्लू अर्जुनचा हा फोटो थोड्याच वेळात सोशल मीडियावर व्हायरल झालाय. आऱ्हासोबतचा हा ‘पिक्चर परफेक्ट मुमेंट’ पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू उमटेल.

आऱ्हाला दोन्ही हातांनी उचलताना अर्जुनच्या चेहऱ्यावरील आनंद सहज पाहायला मिळतोय. तर चिमुकली आऱ्हासुद्धा बाबांच्या सहवासाचा आनंद घेताना दिसतेय. नेहमी आपल्या कामात व्यग्र राहणारा अर्जुन यावेळी मुलीसोबत वेळ घालवताना दिसतोय. याआधी अर्जुनच्या मुलाने म्हणजेच अल्लू आर्यनने एका कार्यक्रमात सर्वांचं लक्ष वेधलं होतं.

Shubh Mangal Saavdhan trailer : आयुषमान आणि भूमीची देसी लव्ह स्टोरी

अर्जुनच्या ‘दुव्वदा जगन्नधाम’ चित्रपटाच्या म्युझिक लाँचच्या कार्यक्रमात त्याचा मुलगा अल्लू आर्यनदेखील उपस्थित होता. या कार्यक्रमाच्या शेवटी अगदी अल्लू अर्जुनप्रमाणेच त्याने मंचावरून जाताना प्रेक्षकांना हात दाखवून त्यांचे आभार मानले. हे पाहून स्वत: अर्जुनसुद्धा आश्चर्यचकित झाला होता. नंतर कार्यक्रमातील फोटो पोस्ट करत ‘आर्यनचे हे हावभाव पाहून मीदेखील आश्चर्यचकित झालो,’ असं ट्विट अर्जुनने केलं.

अल्लू अर्जुन लवकरच ‘ना पेरू सुर्या’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. त्याचा ‘दुव्वदा जगन्नधाम’ चित्रपट चांगलाच गाजला. सलमान खानच्या ‘ट्युबलाइट’ चित्रपटासोबत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने ‘ट्युबलाइट’पेक्षाही जास्त कमाई केलीये.