Allu Arjun Speak Marathi : अभिनेता अल्लू अर्जुन सध्या संपूर्ण देशात त्याच्या ‘पुष्पा २’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी जात आहे. ‘पुष्पा २’चा ट्रेलर पटना शहरात प्रदर्शित झाला. यानंतर अल्लू अर्जुनने संपूर्ण देशात जात ‘पुष्पा द रूल’चे प्रमोशन सुरू केलं आहे. अल्लू अर्जुनने आतापर्यंत चेन्नई, कोची आणि पटना यांसारख्या शहरात प्रमोशन केलं असून तो नुकताच मुंबईत या सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी आला होता. मुंबईत येताच अल्लू अर्जुनने चाहत्यांशी मराठीत संवाद साधून त्यांचं मन जिंकलं. या तेलुगू अभिनेत्याने मुंबईत येत मराठी बोलल्याने त्याचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

अल्लू अर्जुन ‘पुष्पा २’ (Pushpa 2) सिनेमातील मुख्य अभिनेत्री रश्मिका मंदानासह मुंबईत सिनेमाचं प्रमोशन करायला आला होता. याच वेळी झालेल्या कार्यक्रमात अल्लू अर्जुनच स्वागत करण्यात आलं. व्यासपीठावर येताच अल्लू अर्जुनने उपस्थित लोकांशी मराठीत संवाद साधला.

Shreya Ghoshal and ganesh acharya dance on sooseki song of pushpa 2 movie
Video: ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील ‘सूसेकी’ गाण्यावर श्रेया घोषाल आणि गणेश आचार्य यांचा जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
amitabh bachchan reaction after seeing vitthal murti
Video: गर्दीत चाहत्याने आणलेली विठ्ठलाची मूर्ती पाहिली अन्…; अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्रियेचं होतंय कौतुक
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
An emotional video of a delivery boy having food in the middle of the road while delivering an order went viral on social media
परिस्थिती सगळं काही शिकवते! डिलिव्हरी बॉयचा हा VIDEO पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात येईल पाणी
woman receiving a whole set of Diwali gifts from her husband
VIRAL VIDEO : ‘प्रत्येक बायकोचं स्वप्न…’, दिवाळीनिमित्त दिलं हटके गिफ्ट; बारीक-सारीक गोष्टी लक्षात ठेवणाऱ्या नवऱ्याचं होतंय कौतुक
video of school students hugging each other in classroom went viral on social Media obscene video viral
भरवर्गात त्यानं तिला…, शाळेत विद्यार्थ्यांचे अश्लील चाळे; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही तर हद्दच…”

हेही वाचा…“अंगारो सा…”, अल्लू अर्जुन अन् रश्मिकाचा ‘सुसेकी’ गाण्यावर जबरदस्त डान्स! पुष्पा-श्रीवल्लीची केमिस्ट्री पाहून नेटकरी म्हणाले…

‘पुष्पा २’च्या मुंबईतील प्रमोशनदरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अल्लू अर्जुन स्टेजवर येतो तेव्हा निवेदक त्याचं स्वागत करतो आणि तुम्ही इथल्या लोकांशी काही तरी संवाद साधावा अशी विनंती करतो. अल्लू अर्जुन स्टेजवर येताच हाती माईक घेतो आणि सर्वांना “नमस्कार” असं बोलून मान खाली करून अभिवादन करतो. उपस्थित लोक टाळ्या आणि शिट्ट्या वाजवतात. नमस्कार बोलून झाल्यानंतर काही वेळ थांबलेला अल्लू अर्जुन “कसं काय मुंबईकर” असं म्हणतो. पुन्हा लोक टाळ्या वाजवतात. अल्लू अर्जुनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहते त्याचं कौतुक करत आहेत.

अल्लू अर्जुनने मराठीत बोलण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. याआधी तीन वर्षांपूर्वी पुष्पाच्या पहिल्या भागावेळी अल्लू अर्जुन मुंबईत आला होता, तेव्हा त्याने सर्वांशी मराठीत संवाद साधत ‘नमस्कार’ असं मराठीत म्हटलं होतं .

हेही वाचा…‘पुष्पा २’ चित्रपटात दिसणार नाहीत ‘हे’ सीन; सेन्सॉर बोर्डाने बदल करण्याच्या दिल्या सूचना

‘पुष्पा २’ हा सिनेमा ५ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार असून हा चित्रपट २०२१ मध्ये आलेल्या ‘पुष्पा’ या सिनेमाचा सिक्वेल आहे. सुरुवातीला हा सिनेमा ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होणार होता, पण तेव्हा काही तांत्रिक कारणांमुळे हा सिनेमा प्रदर्शित होऊ शकला नाही. मात्र, ५ डिसेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार असून या चित्रपटाने डिजिटल हक्क, प्री बुकिंग आणि टेलिव्हिजन राईट्समधून सिनेमाचं प्रदर्शन होण्याआधी चांगली कमाई केली आहे. ‘पुष्पा’च्या पहिल्या भागाने २०२१ मध्ये प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळवलं. करोना काळातही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम प्रस्थापित केले होते. या अ‍ॅक्शन-ड्रामा चित्रपटात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केलं होतं आणि याही भागात तेच दिग्दर्शन करणार आहेत.