दाक्षिणात्य आणि त्यातही खासकरून तेलुगू आणि कन्नड चित्रपटांनी यावर्षी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. रिषभ शेट्टीचा ‘कांतारा’ अजूनही कमाई करत आहेत. राजामौली यांच्या ‘आरआरआर’ने जपानमध्ये विक्रमी कमाई केली आहे. आता यांच्या पाठोपाठ अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’देखील परदेशात प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार ‘पुष्पा – द राईज’ हा पहिला भाग लवकरच रशियामध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे.

रशियात होणाऱ्या भारतीय चित्रपट महोत्सवाची सुरुवात ‘पुष्पा’पासून होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. शिवाय या सोहळ्याला अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना, दिग्दर्शक सुकुमार आणि निर्माते रवी शंकर हे उपस्थित राहणार आहेत. मॉस्को येथील एका मॉलमध्ये या सोहळ्याच्या उद्घाटन समारंभ पार पडणार आहे. ही बातमी ऐकून कित्येकांचं उर अभिमानाने भरून आलं आहे.

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
South Superstar Allu Arjun Pushpa 2 The Rule makers spent 60 crore on Gangamma Thalli jatara scene
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील ‘या’ सीनसाठी खर्च केले ६० कोटी रुपये! एक-दोन नव्हे तर ‘इतके’ दिवस लागले शूटिंगसाठी
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट

आणखी वाचा : प्रभासला डेट करण्यापूर्वी या अभिनेत्यांबरोबर जोडलं गेलंय क्रिती सेनॉनचं नाव

अधिकृत सोशल मीडियाच्या माध्यमातून निर्मात्यांनी ही माहिती दिली आहे. या ट्वीटमध्ये माहिती दिल्याप्रमाणे १ डिसेंबरला मॉस्कोमध्ये आणि ३ डिसेंबरला सेंट पीटर्सबर्ग येथे याची सादरीकरण होणार आहे. ८ डिसेंबरमध्ये हा चित्रपट रशियन भाषेत प्रदर्शित होणार आहे. मीडिया रीपोर्टच्या माहितीनुसार चित्रपटातील कलाकार मंडळी ३ तारखेच्या स्क्रीनिंगसाठी उपस्थित राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. याबरोबरच ‘आरआरआर’, ‘माय नेम इज खान’, ‘डिस्को डान्सर’ या भारतीय चित्रपटांचंही स्क्रीनिंग होणार आहे.

या बातमीमुळे पुन्हा सोशल मीडियावर पुष्पाची चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे. ‘आरआरआर’ने ज्याप्रकारे जपानमध्ये कमाई केली त्यापेक्षा जास्तच कमाई ‘पुष्पा’मधून होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या चित्रपटाच्या पुढील भागाचं चित्रीकरणही सुरू झालं आहे. नुकतंच दिग्दर्शक आणि अल्लू अर्जुन यांनी ही माहिती दिली होती, ‘पुष्पा’चा पुढचा भाग २०२३ मध्ये प्रदर्शित होईल अशी चर्चा आहे.