अल्लू सिरीशने केली आगामी चित्रपटाची घोषणा!

प्री-लुक पोस्टर व्हायरल झाले आहे.

एबीसीडीनंतर दोन वर्षांनी, अल्लू सिरीशने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. गुरुवारी त्याने आगामी चित्रपटाचे प्री-लुक पोस्टर प्रदर्शित केले आहे. प्रदर्शित करण्यात आलेल्या पोस्टरमुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते. अल्लू सिरीशने चित्रपटाची घोषणा करताच ट्विटरवर #Sirish6 ट्रेंड होण्यास सुरुवात झाली होती.

अल्लू सिरीशने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये एक कपल दिलत आहे. या चित्रपटात अल्लू सिरीश सोबत अनु इमॅनुएल दिसणार आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन राकेश शशी करणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती जीए २ पिक्चर्स करणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Allu Sirish (@allusirish)

आणखी वाचा : डॉ. अजित कुमारचा खरा चेहरा येणार समोर? ‘देवमाणूस’ मालिकेत नवे वळण

काही दिवसांपूर्वी अल्लू सिरीशचा ‘विलायती शराब’ हा व्हिडीओ अल्बम प्रदर्शित झाला होता. प्रदर्शित झाल्यानंतर काही वेळातच या व्हिडीओला १०० मिलियन व्ह्यूज मिळाले होते. चाहत्यांच्या प्लेलिस्टमध्ये ते अजुनही आपली जागा कायम ठेवून आहे. एबीसीडीशिवाय अल्लू सिरीशचा आणखी एक चित्रपट ओक्का क्षनम हिंदीत ‘शूरवीर’ या नावाने डब करण्यात आला आहे. तेलुगु आणि मल्याळम चित्रपटातील अल्लू सिरीशची कामगिरी चाहत्यांच्या मनात घर करून आहे आणि म्हणूनच त्याचे चाहते त्याच्या नव्या चित्रपटाची आतुरतेने वाट पहात आहेत. या प्री-लुक पोस्टरने तर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. अल्लू सिरीशच्या वाढदिवशी, म्हणजे 30 मे रोजी ‘फर्स्ट लुक’ येणार असल्याची घोषणा या पोस्टरद्वारे करण्यात आली आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Allu shirish upcoming movie avb

Next Story
नाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं!
ताज्या बातम्या