Anant Ambani And Radhika Merchant Wedding : अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा शाही विवाहसोहळा आज ( १२ जुलै २०२४ ) पार पडणार आहे. या लग्नसोहळ्यासाठी खास देश-विदेशातील पाहुणे भारतात दाखल झाले आहेत. याशिवाय या लग्नसोहळ्याला बॉलीवूडकरांची मांदियाळी सुद्धा पाहायला मिळेल. सध्या सर्वत्र अंबानींच्या घरच्या लग्नकार्याची चर्चा चालू आहे. यासाठी मुंबईत वाहतूक मार्गात देखील बदल करण्यात आले आहेत. आता अनंत-राधिकाच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर केव्हा समोर येणार याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झालेली आहे. अशातच अंबानींची होणारी सून आता लग्नमंडपाच्या दिशेने मार्गस्थ झालेली आहे. गेल्या काही दिवसांपासून मामेरू, हळद, मेहंदी, शिवपूजा, गृह शांती पूजा हे सगळे विधी अंबानींच्या राहत्या घरी म्हणजेच अँटालियावर करण्यात आले. तर, अनंत-राधिकाचं लग्न जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडणार आहे. त्यामुळे अँटालियावरून बीकेसीच्या दिशेने अंबानींची होणारी सून शुक्रवारी दुपारच्या सुमारास मार्गस्थ झाली आहे. याचा व्हिडीओ 'विरल भय्यानी' या पापाराझी इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. हेही वाचा : अंबानींच्या घरी पार पडली गृहशांती पूजा; अनंत-राधिकाला पाहताच मुकेश अंबानी झाले भावुक! Inside व्हिडीओ व्हायरल अंबानींची होणारी सून लग्नस्थळी निघाली राधिका Lexus या आलिशान कारमधून प्रवास करत बीकेसीच्या दिशेने मार्गस्थ होत असल्याचं या व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. या कारला समोरुन फुलांची सजावट करण्यात आली असून, या गाडीच्या काचा शेडने झाकलेल्या होत्या. त्यामुळे राधिकाची झलक या व्हिडीओमध्ये दिसू शकली नाही. आता अंबानींची होणारी ही धाकटी सून लग्नात कसा लूक करते याची उत्सुकता सर्वांनाच आहे. यापूर्वी राधिकाने गरबा नाइट्स, संगीत, शिवपूजा, गृहशांती व हळदीला केलेले लूक चर्चेचा विषय ठरले होते. त्यामुळे आता मूळ लग्नात ही नवीन नवरी कशी सजते याची आतुरता प्रत्येकाला आहे. हेही वाचा : Anant Ambani Wedding Live Updates: अनंत-राधिकाच्या लग्नस्थळी लोकांची गर्दी, पाहा जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरचा Video हेही वाचा : अनंत-राधिकाच्या लग्नात ऐतिहासिक काशी शहराची प्रतिकृती! पहिली झलक दाखवत नीता अंबानी म्हणाल्या… अनंत - राधिकाचा भव्य लग्नसोहळा १२ जुलै ते १५ जुलैपर्यंत पार पडणार आहे. यासाठी प्रियांका चोप्रा, किम कार्दशियन, युकेचे माजी पंतप्रधान बोरिस जॉनसन, सॅमसंग कंपनीचे मालक ली बायंग-चुल यांसारखे परदेशी पाहुणे भारतात दाखल झाले आहेत. याशिवाय बॉलीवूड सेलिब्रिटी आणि काही प्रमुख राजकीय मान्यवर देखील अनंत-राधिकाला आशीर्वाद देण्यासाठी मुंबईला पोहोचणार आहेत.