scorecardresearch

‘कहो ना प्यार है’वरुन करीना व अमिषामध्ये झाला होता वाद? २२ वर्षांनंतर अभिनेत्रीने केला खुलासा

एका मुलाखतीमध्ये अमिषाने वक्तव्य केले आहे.

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनचा ‘कहो ना प्यार है’ हा चित्रपट २००० साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन हृतिकचे वडील राकेश रोशन यांनी केले. या चित्रपटात हृतिकसोबत अभिनेत्री अमिषा पटेल मुख्य भूमिकेत दिसली. पण सोनिया सक्सेना या भूमिकेसाठी सुरुवातील करीना कपूर खानला विचारण्यात आले होते. पण काही कारणास्तव करीनाने भूमिकेस नकार दिला. त्यावेळी करीना आणि अमिषा यांच्यामध्ये भांडण झाले होते. आता या भांडणावर जवळपास २२ वर्षांनंतर अमिषाने वक्तव्य केले आहे.

‘कहो न प्यार है’ या चित्रपटातून अमिषाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या पहिल्याच चित्रपटाने तिला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले होते. पण चित्रपटातील अभिनय पाहाता अनेकांनी तिच्यावर टीका केली होती. तिला ‘वाईट अभिनेत्री’ म्हणून सुनावले होते. आता स्वत: अमिषाने यावर वक्तव्य केले आहे.
आणखी वाचा : ‘हिला उर्फी जावेदकडून प्रेरणा मिळाली’, कपड्यांमुळे दीपिका पदुकोण झाली ट्रोल

अमिषाने नुकतीच ‘पिंकविला’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ती म्हणाली, ‘माझा कोणी शत्रू नाही. खरं तर जेव्हा करीना कोणत्या गाण्यात किंवा चित्रपटात सुंदर दिसते आणि चांगलं परफॉर्म करते तेव्हा मी माझ्या जवळच्या मित्रमैत्रीणींना सांगत असते की तिचे काम खूप छान आहे. ती एक सुंदर महिला आहे आणि उत्तम अभिनेत्री आहे. तिच्या बद्दल माझ्या मनात कोणताही वाईट विचार नाही.’
आणखी वाचा :…अन् अभिनेत्रीने वेटरकडेच केली होती सेक्सची मागणी

पुढे ती म्हणाली, ‘मी काही बोलू इच्छित नाही. कारण तिच्याविषयी बोलण्यासाठी पॉझिटिव्ह गोष्टी आहेत. मी तिला फार ओळखतही नाही. मला तिच्या कामाविषयी माहिती आहे. माझ्याविषयी तिचे काही मत असेल तर ते असू द्या. मला या गोष्टीवर जास्त बोलायचे नाही.’

अमिषा २०१८मध्ये ‘भैयाजी सुपरहिट’मध्ये दिसली होती. ती लवकरच सुपरहिट मूव्ही ‘गदर’च्या सीक्वेलमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात सनी देओल आणि ती मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ameesha patel breaks silence on her feud rumours with kareena kapoor khan avb

ताज्या बातम्या