“आम्ही दोघांनी…” पाकिस्तानी अभिनेत्याला डेट करण्यावर अमिषा पटेलची पहिली प्रतिक्रिया | Loksatta

“आम्ही दोघांनी…” पाकिस्तानी अभिनेत्याला डेट करण्यावर अमिषा पटेलची पहिली प्रतिक्रिया

पाकिस्तानी अभिनेता इमरान अब्बास आणि अमिषा पटेल यांचा एक रोमँटिक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

“आम्ही दोघांनी…” पाकिस्तानी अभिनेत्याला डेट करण्यावर अमिषा पटेलची पहिली प्रतिक्रिया
अमिषा पटेलने सांगितले पाकिस्तानी अभिनेत्याबरोबरच्या त्या रोमँटिक व्हिडीओमागचे सत्य

‘कहो ना प्यार है’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणून अमिषा पटेलला ओळखले जाते. ती कायमच तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून अमिषा एका पाकिस्तानी अभिनेत्याला डेट करत असल्याचं बोललं जात आहे. एका रोमँटिक व्हिडीओमुळे या चर्चांना उधाण आले होते. मात्र नुकतंच अमिषा पटेलने या व्हिडीओमागचे सत्य सांगितले आहे. तसेच तिने त्या अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चांवरही भाष्य केले आहे.

पाकिस्तानी अभिनेता इमरान अब्बास आणि अमिषा पटेल यांचा एक रोमँटिक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यामुळे त्या दोघांचे अफेअर सुरु आहे, अशा चर्चाही रंगल्या होत्या. मात्र नुकतंच ‘हिंदुस्तान टाइम्स’शी बोलताना तिने याबद्दल सांगितले. यात ती म्हणाली, “एका कार्यक्रमादरम्यान आम्ही भेटलो होता. त्यावेळी आम्ही क्रांती चित्रपटातील ते मजेशीर गाणे शूट करण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटात मी हे गाणे बॉबी देओलबरोबर शूट केले आहे. त्याच गाण्यावर आम्ही दोघांनी एक व्हिडीओ शूट केला. त्यानंतर तो इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि त्यानंतर अफेअरच्या चर्चांना उधाण आले.”
आणखी वाचा : ‘तू माझ्याशी लग्न करशील का?’ काँग्रेस नेत्याच्या मुलाने अभिनेत्री अमिषा पटेलला केलं उघडपणे प्रपोज, स्पष्टीकरण देताना म्हणाली…

“या व्हिडीओबद्दल अनेकांनी दिलेल्या बातम्या, पोस्ट मी वाचल्या. हे पाहिल्यानंतर मला फार हसू आले. हा संपूर्ण प्रकार फार वेडेपणाचा आणि मूर्खपणाचा आहे. मी खूप वर्षांनी माझ्या मित्राला भेटली आणि ती फक्त एक भेट होती.” असेही तिने सांगितले.

आणखी वाचा : “कुशल बद्रिकेने मला जबरदस्ती…” श्रेया बुगडेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

“माझे या चित्रपटातील हे गाणे अब्बासला फार आवडते. ते आमच्या दोघांचेही आवडीचे गाणे आहे. त्यामुळे आम्ही दोघांनी पटकन एक व्हिडीओ केला आहे. त्याच्या मित्राने हा व्हिडीओ शूट केला. तो व्हिडीओ फार चांगला झाला होता. त्यामुळे मी तो सोशल मीडियावर शेअर केला. यातील एकही गोष्ट नियोजनानुसार नव्हती”, असे अमिषा पटेलने म्हटले.

दरम्यान अमिषा पटेल ही सध्या गदर २ च्या शूटींगमध्ये व्यक्त आहे. यात ती सनी देओल आणि उत्कर्ष शर्मासोबत दिसणार आहे. याशिवाय ती अर्जुन रामपाल आणि डेजी शाहसोबत ‘मिस्ट्री ऑफ टॅटू’ या चित्रपटातही काम करत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“कुशल बद्रिकेने मला जबरदस्ती…” श्रेया बुगडेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

संबंधित बातम्या

‘आरआरआर’, ‘केजीएफ’ नव्हे तर ‘या’ चित्रपटाला लोकांनी सर्वाधिक सर्च केलंय; गुगलने दिली माहिती
“दीपाली सय्यद यांनी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून बोगस लग्न लावली”, माजी स्वीय्य सहाय्यकाचे गंभीर आरोप; राज्यपालांवर
‘पसूरी’, ‘श्रीवल्ली’ की ‘चांद बालियां’? पाहा कोणतं आहे २०२२ मधील सर्वात लोकप्रिय गाणं
‘कधी तिच्यासोबत मंदिरातही जा..’ अजमेर शरीफला गेल्यानं शोएब- दीपिका ट्रोल
नोरा फतेहीला डान्सरचा चुकीच्या पद्धतीने स्पर्श; व्हिडीओ व्हायरल

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Maharashtra Karnataka border: एसटीच्या ३८२ फेऱ्या अंशत: रद्द
सुशोभीकरणाच्या १८७ कामांचा आज प्रारंभ; शिंदे गट – भाजपची मुंबई महापालिका निवडणूक तयारी सुरू
‘धारावी प्रकल्पाचे काम केवळ पाच हजार कोटींना कसे दिले?’; गैरव्यवहार असल्याचा पटोले यांचा आरोप
सर्व पोलिसांनी न्यायालयात गणवेशातच उपस्थित राहावे!; उच्च न्यायालयाचे आदेश
नोटाबंदीसंबंधी कागदपत्रे सादर करा!; केंद्र सरकार, रिझव्‍‌र्ह बँकेला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश