scorecardresearch

“कहो ना प्यार है’ च्या सेटवर हृतिक रोशन मारुती गाडीतून यायचा अन् मी…”, अभिनेत्री अमिषा पटेलने केला खुलासा

अमीषा पटेलने एका मुलाखतीत काही लोक तिला गर्विष्ठ असल्याचे समजत होते, असा खुलासा केला आहे.

‘कहो ना प्यार है’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री अमिषा पटेलला ओळखले जाते. ती नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. गेल्या काही वर्षांपासून ती सिनेसृष्टीपासून दूर आहे. पण तरीही ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. अनेकदा विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. सध्या अमिषा ही गदर २ या चित्रपटाचे शूटींग करत आहे. नुकतंच अमीषा पटेलने एका मुलाखतीत काही लोक तिला गर्विष्ठ असल्याचे समजत होते. याच्यामुळेच माझी प्रतिमा तशी झाली आहे, असा खुलासा केला आहे.

अमिषाने २००० साली हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यावेळी अमिषा पटेल म्हणाली की, “मला दक्षिण मुंबईतील एक श्रीमंत आणि बिघडलेली मुलगी असल्याचे सादर केले होते. कारण मी सेटवर कोणालाही शिव्या दिल्या नाही. तसेच कुणाबद्दल कोणतीही चुगली केलेली नाही. मी सेटवर कोणत्याही प्रकारचा मूर्खपणा करत नसे. तसेच या गोष्टींकडे मी कधी लक्षही दिलं नाही.”

“मला पुस्तकं वाचायची प्रचंड आवड होती. मला सुरुवातीपासून पुस्तकं वाचण्याची सवय होती. मी एखादे पुस्तक तीन दिवसात वाचून संपवायचे. यामुळे अनेकजण म्हणायचे की अमीषा खूप गर्विष्ठ आहेत, ती स्वत:ला काय समजते, माहित नाही, असे अनेकजण माझ्या पाठीमागे बोलायचे,” असेही तिने यावेळी सांगितले.

“माझी देवावर नितांत श्रद्धा…”, वादग्रस्त वक्तव्यानंतर श्वेता तिवारीने माफी मागत दिले स्पष्टीकरण

“ती एका मोठ्या कुटुंबातील असल्याने शूटींगच्या पहिल्या दिवशी ती मर्सडिज गाडीतून आली होती. तर हृतिक रोशन हा मारुती गाडीतून आला, यावरुन लोक गंमत करायचे. पण यात दिखावा करण्यासारखे काहीही नव्हते. ते माझे पालनपोषण, छंद होते. मला कधीच कोणाबद्दल वाईट बोलायला शिकवले नाही,” असेही तिने सांगितले.

दरम्यान लवकरच ती सनी देओल आणि उत्कर्ष शर्मासोबत ‘गदर’ या सुपरहिट चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये दिसणार आहे. याशिवाय ती अर्जुन रामपाल आणि डेजी शाहसोबत ‘मिस्ट्री ऑफ टॅटू’ या चित्रपटातही झळकणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ameesha patel says people made fun when she came in mercedes hrithik roshan in maruti during kaho naa pyaar hai shoot nrp

ताज्या बातम्या