adam-west

हॉलीवूड मनोरंजनसृष्टीत एक उत्तम अभिनेता म्हणून नावाजलेले अ‍ॅडम वेस्ट यांचे वयाच्या ८८व्या वर्षी निधन झाले आहे. सत्तरपेक्षा जास्त चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांतून अभिनय करणाऱ्या अ‍ॅडम यांनी १९५७ साली ‘वूडू आइसलॅण्ड’ या चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. आपल्या दर्जेदार अभिनयाच्या जोरावर ‘मेयर वेस्ट’, ‘कॉलनेल डॅन’, ‘कॅटमॅन’ यांसारख्या अनेक व्यक्तिरेखा त्यांनी गाजवल्या आहेत. १९६० साली ‘डीसी एक्स्टेंडेड युनिव्हर्स’ निर्मित ‘बॅटमॅन’ या लोकप्रिय दूरदर्शन मालिकेतून ते खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले. आज विसाव्या शतकात एखादा सुपरहिरो साकारण्यासाठी थ्रीडी अ‍ॅनिमेशन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. परंतु १९६० साली अ‍ॅडम वेस्ट यांनी अत्यल्प तंत्रज्ञानात उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर ‘बॅटमॅन’ हा सुपरहिरो प्रेक्षकांसमोर उभा केला. ते सुपरहिरोच्या भूमिकेत इतके चपखल बसले की त्यानंतर ‘मायकल केटन’, ‘क्रिश्चियन बेल’ या अभिनेत्यांनी जेव्हा बॅटमॅन साकारला तेव्हा त्याची तुलना प्रेक्षक अ‍ॅडम यांनी साकारलेल्या बॅटमॅनशी करू लागले. पुढे वाढत्या वयाबरोबर त्यांच्या अभिनयातील दरारा काहीसा कमी होत गेला, परंतु त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रातही कसब आजमावले. काही वर्षांपूर्वी त्यांना ‘ल्यूकेमिया’ नामक कर्करोगाची लागण झाली. यांत रक्तातील पांढऱ्या पेशींचे प्रमाण हळूहळू कमी होत जाते. या रोगाशी त्यांनी एका सुपरहिरोप्रमाणे झुंज दिली. परंतु अखेर त्यांच्या शरीराने त्यांची साथ सोडली आणि एका गुणी कलावंताने रंगभूमीचा कायमचा निरोप घेतला.

Virat Kohli Dancing on Chiku Chants While Fielding
विराट कोहलीला चिकू हाक मारताच त्यानं फिल्डिंग सोडून केलं असं काही..चाहते झाले थक्क; पाहा Video
Mohammed Abdul Arfath found dead in US
अमेरिकेत मुलाचा मृत्यू, डोक्यावर ४३ लाखांचे शैक्षणिक कर्ज; भारतीय विद्यार्थ्याच्या कुटुंबाची करुण कहाणी
Nagpur, boy died, electric shock,
नागपूर : विजेच्या धक्क्याने नऊ वर्षांचा मुलगा ठार
Peter Higgs predicted the existence of a new particle
‘गॉड पार्टिकल’चा शोध लावणारे नोबेल विजेते शास्त्रज्ञ पीटर हिग्ज यांचं निधन, वयाच्या ९४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास