ग्लोबल स्टार आणि बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तिचा सोशल मीडियावर बराच मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळेच तिच्या नावाची चर्चा नेहमीच होताना दिसते. आताही काहीसं असंच घडलं आहे. सध्या प्रियांका चोप्रा चर्चेत आहे ते प्रसिद्ध अमेरिकन कॉमेडियन रोझी ओडोनेलमुळे. रोझीनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्राची माफी मागितली. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

रोझीनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिनं प्रियांका चोप्रासोबतच्या पहिल्या भेटीचा उल्लेख केला आहे. या व्हिडीओमध्ये तिनं म्हटलंय, ‘मी जेव्हा प्रियांकाला पहिल्यांदा भेटले तेव्हा ती निक जोनससोबत आली होती आणि मला वाटायचं की ती भारतीय लेखक दीपिक चोप्रा यांची मुलगी आहे. त्यामुळे मी म्हटलं, हाय निक जोनस तू ‘किंगडम’मध्ये कमाल केलीस. त्यानंतर प्रियांकाला सुद्धा हॅलो म्हणत तिला सांगितलं, मी तुझ्या वडिलांना मी ओळखते. त्यावर ती म्हणाली, ‘तुम्ही त्यांना ओळखता? तुम्हाला माहीत आहे की माझे वडील कोण आहेत?”

Gukesh vs Ian Nepo ends in a draw
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : गुकेश-नेपोम्नियाशी लढत बरोबरीत, संयुक्त आघाडी कायम; विदितने प्रज्ञानंदला रोखले; कारुआना, नाकामुरा विजयी
Joe Biden
नेतन्याहू यांचा युद्धाकडे पाहण्याचा दृष्टिकोन ही चूक; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भूमिका
baltimore
US Bridge Collapse: धोक्याची सूचना देणाऱ्या भारतीय खलाशांचे जो बायडेन यांनी मानले आभार
america bridge collapse
विश्लेषण : अमेरिकेत ४७ वर्ष जुना पूल कसा कोसळला? किती जणांनी गमावला जीव?

आणखी वाचा- रश्मिकासोबत लग्नाच्या चर्चांवर विजय देवरकोंडानं सोडलं मौन, म्हणाला…

रोझी पुढे सांगते, प्रियांकाच्या या प्रश्नावर मी, ‘हो, दीपक’ असं उत्तर दिलं. यावर प्रियांका म्हणाली, ‘नाही… आणि चोप्रा हे खूप कॉमन आडनाव आहे भारतात.’ आपल्या पुढच्या व्हिडीओमध्ये या संपूर्ण प्रकरणाबाबत रोझीनं माफी मागितली आहे. ती म्हणाली, ‘लोकांना वाटलं की प्रियांका उद्धटपणे बोलली. पण असं नव्हतं खरं तर ती परिस्थिती खूपच विचित्र होती. ती खूप प्रसिद्ध अभिनेत्री आहे आणि लोकांच्या माते ती निकपेक्षाही लोकप्रिय आहे. पण आमची पहिली भेट खूपच विचित्र होती. मी फक्त प्रियांका आणि निकचीच नाही तर तुम्हा सर्वांची या प्रकाराबाबत माफी मागू इच्छिते. मी चुकीचा विचार केला.’

दरम्यान अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन पॉपस्टार निक जोनस यांनी २०१८ साली लग्न केलं होतं. या वर्षी जानेवारी महिन्यात हे दोघंही आई-बाबा झाले आहे. प्रियांकानं यासाठी सरोगसीची मदत घेतली. प्रियांकाच्या कामाबद्दल बोलायचं तर ती या आधी ‘द व्हाइट टायगर’ या चित्रपटात दिसली होती. त्यानंतर आता लवकरच ती फरहान अख्तरचं दिग्दर्शन असलेला चित्रपट ‘जी ले जरा’मध्ये कतरिना कैफ आणि आलिया भट्ट यांच्यासोबत दिसणार आहे.