हॉलिवूड पॉप स्टार एरियाना ग्रांडे सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी एका अज्ञात व्यक्तीने एरियानाच्या घरी घुसून धमकी दिली आणि चाकूने हल्ला केला होता. पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. याबाबत एरियानने स्वत: माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी एका अज्ञात व्यक्तीने एरियानाच्या घरात घुसून तिच्यावर आणि तिच्या बॉडीगार्डवर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलीस तेथे पोहोचले आणि त्यांनी त्या व्यक्तीला अटक केली. काही महिन्यांपूर्वी याच व्यक्तीने एरियानाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. एरियानाने स्वत: याबाबत माहिती दिली आहे. जवळपास गेल्या ७ महिन्यांपासून ही व्यक्ती एरियानाला त्रास देत होती. पण ९ सप्टेंबर रोजी या व्यक्तीने एरियानाच्या घरात घुसून तिच्यावर हल्ला केला. तिच्या बॉडीगार्डला देखील धमकी दिली. काही वेळानंतर पोलीस तेथे पोहोचले. याबाबत माहिती देताना एरियाना म्हणाली, 'मला माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांच्या सुरक्षेची काळजी वाटते. जर ती अज्ञात व्यक्ती तुरुंगातून बाहेर आली तर पुन्हा माझ्या घरी येऊ शकते आणि आमच्यावर हल्ला करु शकते.' मे महिन्यात एरियानाने डाल्टन गोमेजशी लग्न केले. त्यांच्या लग्नातील काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. त्यांच्या लग्नाला केवळ २० लोक उपस्थित होते. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.