पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा ‘द लेजेंड ऑफ मौला जट्ट’ हा चित्रपट सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. या चित्रपटाने केवळ पाकिस्तानातच नाही तर परदेशातही चांगली कमाई केली. नुकतंच दुबई येथे झालेल्या ‘रेड सी फेस्टिव्हल’मध्ये या चित्रपटाचं बरंच कौतुक झालं. एवढंच नाही तर अभिनेता रणबीर कपूरनेही याच फेस्टिव्हलमध्ये बोलताना या चित्रपटाच्या टीमचं अभिनंदन आणि कौतुक केलं आहे.

रणबीर कपूरने या चित्रपटाचं कौतुक केल्यानंतर हा चित्रपट भारतता प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. जगभरात तुफान कमाई करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलेल्या या चित्रपटाची भारतातही चर्चा सुरु झाल्यानंतर मात्र मनसेने या चित्रपटाच्या भारतातील प्रदर्शनाला विरोध केला आहे. मनसे नेते अमेय खोपकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

Kangana Ranaut
चित्रपटसृष्टीने आपल्याला अनेकदा अपमानित केले, कंगना राणावतचा न्यायालयात दावा
chamkila-movie-release-date
ठरलं! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार इम्तियाज अलीचा बहुचर्चित चित्रपट ‘अमर सिंह चमकीला’; वाचा कुठे पाहायला मिळणार?
Gautami Patil First Time Revels Real Name Chatting With Fan Gautami Patil Lavani Video To Surname and Leaked Video Controversy
गौतमी पाटीलचं खरं नाव माहितेय का? चाहतीशी गप्पा मारताना स्वतःचं केला खुलासा.. आडनावावरूनही झाला होता वाद!
geethanjali-malli-vanchidi
चक्क स्मशानभूमीत प्रदर्शित होणार चित्रपटाचा टीझर; चित्रपटसृष्टीतील पहिल्या सर्वात धाडसी इव्हेंटबद्दल जाणून घ्या

आणखी वाचा-रणबीर कपूरला करायचंय पाकिस्तानी कलाकारांबरोबर काम; म्हणाला “अभिनेत्याला मर्यादा…”

अमेय खोपकर यांनी ‘द लेजेंड ऑफ मौला जट्ट’ या चित्रपटाच्या भारतातील प्रदर्शनावर आक्रमक प्रतिक्रिया देताना लिहिलं, “फवाद खानचा ‘द लेजेंड ऑफ मौला जट्ट’ हा पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित करण्यासाठी हालचाली सुरु आहेत. चीड आणणारी गोष्ट म्हणजे भारतीय कंपनी चित्रपट प्रदर्शनासाठी पायघड्या घालतेय. राजसाहेबांनी दिलेल्या आदेशानुसार आम्ही हा चित्रपट राज्यासह देशभरात कुठेही प्रदर्शित होऊ देणार नाही.” अमेय खोपकर यांच्या या ट्वीटवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान फवाद खानच्या ‘द लेजेंड ऑफ मौला जट्ट’ या चित्रपटाने केवळ पाकिस्तानमध्येच नाही तर जगभरात कोट्यवधींचा गल्ला जमवला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसचे अनेक रेकॉर्ड मोडले. भारतातही या चित्रपटाबाबत कुतूहल दिसून येत आहे. काही रिपोर्ट्सनुसार लवकरच हा चित्रपट भारतातही या चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे असं बोललं जातंय. रणवीर सिंहच्या ‘सर्कस’ चित्रपटाशी या चित्रपटाची टक्कर होऊ शकते.