‘पुढचा प्रवास खडतर असेल तर…’, अमेय वाघने खरेदी केली नवी कार

अमेयने कारसोबतचा फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

‘दिल दोस्ती दुनियादारी’ असो, ‘फास्टर फेणे’ असो किंवा ‘अमर फोटो स्टुडिओ’ आपल्या अभिनयानं चाहत्यांना भुरळ पाडणार अभिनेता म्हणजे अमेय वाघ. नाटक, मालिका, चित्रपट आणि वेबसीरिज अशा विविध माध्यमांमध्ये झळकलेल्या अमेयने कलाविश्वात त्याच स्वत: स्थान निर्माण केलं आहे. उत्तम अभिनय शैली आणि योग्य कथानकांची निवड यामुळे अमेयचा चाहतावर्ग अफाट आहे. आज १३ नोव्हेंबर रोजी अमेय वाघचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्याने एक नवी महागडी कार खरेदी केली आहे.

अमेयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कार सोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने ‘पुढचा प्रवास खडतर असेल… तर तो Mercedes ने करावा म्हणतो! मी वाढदिवशी स्वत:लाच गिफ्ट दिले आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

अमेयच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. अभिनेत्री सई ताम्हणकरने, ‘नाद खुळा’ असे म्हटले आहे. तर अभिनेता उमेश कामतने तुझे मनापासून अभिनंदन असे म्हटले आहे. स्वप्निल जोशीने ‘ये बात! होऊ दे खर्च’ असे कमेंट करत म्हटले आहे.

लवकरच अमेय वाघचा ‘झोंबिवली’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अमेयसोबत अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ४ फेब्रुवारी २०२२मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. आत्तापर्यंत गेम्समध्ये, हॉलिवूड चित्रपटांमध्ये पाहिलेले झोम्बीज मराठी चित्रपटातही पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Amey wagh brought a new car mercedes avb

Next Story
नाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं!
ताज्या बातम्या