अमेय वाघ याला सध्याच्या घडीला आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखले जाते. सोशल मीडियावर अमेय हा नेहमीच सक्रिय असतो. त्याचे फोटो आणि हटके कॅप्शन्स सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनतात. आता पुन्हा एकदा अमेय त्याच्या एका पोस्टमुळे चर्चेत आला आहे. अमेयने केलेली पोस्ट सगळ्यांनाच गोंधळात टाकणारी आणि नवे प्रश्न निर्माण करणारी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : सुपरस्टार अल्लू अर्जुनची लेक मोठ्या पडद्यावर पाऊल टाकण्यासाठी सज्ज, ‘या’ चित्रपटातून करणार पदार्पण

अमेयने फेसबुकवर केलेल्या या पोस्टमध्ये “जंगलात राघू खूप असतात पण वाघ मात्र एकच असतो… याची कृपया नोंद घ्यावी,” असं लिहिलं आहे. त्यासोबतच त्याने सुमित राघवनला टॅगही केलं आहे. या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या दोघांमध्ये वादाची ठिणगी निर्माण झाल्याचा संशय त्यांच्या चाहत्यांना येत आहे. त्यामुळे या दोघांमध्ये नेमकं काय घडलं आहे हे सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे.

या पोस्टला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. त्यावरुन त्याला अनेक नेटकऱ्यांनी अमेयला अनेक प्रश्नही विचारले आहेत. “काय झालं की तू सुमित राघवन यांच्यावर चिडला?”, “नेमका विषय काय आहे?”, “हा कसला अॅटिट्युड?” असे अनेक प्रश्न कमेंट्स करत नेटकरी त्याला विचारात आहेत.

यावर सुमित राघवननेही एक पोस्ट लिहीत त्याला उत्तर दिलं आहे. “सर्कशीतल्या वाघाचा फार त्रागा होतोय असं वाटतंय.. कसं ना फक्त आडनाव वाघ असल्याने कोणी वाघ हॉट नाही याचीही कृपया नोंद घ्यावी,” अशी पोस्ट लिहीत सुमितने अमेयला टॅग केलं आहे.

हेही वाचा : शिल्पा नवलकरने केला निर्मात्यावर ‘सेल्फी’ची कथा चोरी केल्याचा आरोप, सुरु झाला नवा वाद

अमेय आणि सुमितने ही पोस्ट रागात येऊन केली की यामागे दुसरं कोणतं कारण आहे, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. तसंच नेटकऱ्यांनी विचारलेल्या एकाही प्रश्नाचं अजून अमेयने दिलेलं नाही. तर अमेय आगामी चित्रपटाचं प्रमोशन करतोय, असाही अंदाज काहीजणांनी लावला आहे. आता जेव्हा या दोघांपैकी कोणीतरी यावर स्पष्टपणे प्रतिक्रिया देईल तेव्हाच याबद्दल काहीतरी उलगडा होईल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amey wagh posted his thoughts about sumit raghvan got viral rnv
First published on: 25-09-2022 at 14:06 IST