Ameya Khopkar Post For Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठी सिझन ५ ची रंगत दिवसेंदिवस वाढत जातेय. सिने आणि रील इंडस्ट्रीतील अनेक प्रसिद्ध चेहरे या सिझनमध्ये असल्याने स्पर्धकांमध्ये चांगलीच चुरस रंगली आहे. दरम्यान, प्रत्येक एपिसॉड वादग्रस्त ठरत असून त्याची सोशल मीडियावरही तुफान चर्चा होतेय. सतत वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या जान्हवी किल्लेकरने आता पंढरीनाथ कांबळे ऊर्फ पॅडीचा त्याच्या अभिनयावरून अपमान केलाय. यावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकरांनी पंढरीनाथ कांबळेची बाजू घेत जान्हवी किल्लेकरवर टीकास्र सोडलं आहे.

‘बिग बॉस’च्या ( Bigg Boss Marathi ) मंगळवारच्या भागामध्ये जान्हवी किल्लेकरने ‘सत्याचा पंचनामा’ टास्कदरम्यान पंढरीनाथ कांबळेचा अभिनयावरून अपमान केला. जान्हवी म्हणाली, “सगळे घाणेरडे आहेत. यांच्यात दम नाहीये समोर येऊन बोलायला. पॅडी दादाच्या तर काहीतरी अंगातच घुसलंय. आयुष्यभर ओव्हर अ‍ॅक्टिंग करून दमले. आता ती ओव्हर अ‍ॅक्टिंग घरात दाखवतायत.” जान्हवीने पंढरीनाथ कांबळेचा केलेला हा अपमान ऐकून आर्या तिला जाब विचारायला गेली. तेव्हा देखील जान्हवी म्हणाली, “मी फालतू माणसांना रिप्लाय देत नाही.” अभिनेत्रीच्या या वर्तुणकीचा निषेध आता मराठी कलाकार मंडळी करत आहेत. पंढरीनाथचा अपमान केल्यामुळे तिच्यावर चहूबाजूने टीका होत आहेत.

murder in nagpur, crime news
नागपूर : धक्कादायक! प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय; मित्राला घराच्या छतावरून फेकले…
ankita walawalkar reveals marriage plans and talk about future husband
अंकिताचा ‘कोकण हार्टेड बॉय’ कोण आहे? कोकणात करणार…
In Badlapur case accused Akshay Shinde Thane alleged encounter
चकमकी अखेर पोलिसांवरच का शेकतात?
PM narendra modi Chandrababu Naidu and Nitish kumar
तिरुपती लाडू भेसळ वाद आणि नितीश कुमारांकडून राम मंदिराचे कौतुक; भाजपाच्या मित्रपक्षांनीही रेटला हिंदुत्वाचा मुद्दा
Mercedes-Benz, Supriya Sule, Supriya Sule latest news,
मर्सिडिज बेंझला नोटीस देण्याच्या टायमिंगवर शंका; खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “शासनाने…”
transgender stealing gold worth rs 2. 4 lakh from home who came for ganpati darshan in kalyan
कल्याणमध्ये गणपती दर्शनासाठी घरात येऊन तृतीयपंथीय टोळीकडून सोन्याच्या ऐवजाची चोरी
Small child seriously injured in attack by dog in Pune
पुण्यात कुत्र्याच्या टोळक्यांच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी; चाकणमधील घटना
Vinesh Phogat Allegations on PT Usha Senior Lawyer Harish Salve Gives Statement
Vinesh Phogat: विनेश फोगटचे पीटी उषा यांच्यावरील आरोप खोटे? वकिल हरिश साळवे यांनी सांगितलं नेमकं काय घडलं?

हेही वाचा >>“रितेश भाऊ हे अक्षम्य…”, निक्की-जान्हवीवर मराठी अभिनेत्याचा संताप; पंढरीनाथबद्दल म्हणाला, “तू आतमध्ये भीड…”

अमेय खोपकरांची पोस्ट काय?

“पॅडी, तुझा प्रवास आणि तुझा संघर्ष आम्ही सर्वांनी खूप जवळून पाहिलाय. नेहमीच खळखळून हसवलंस आम्हाला सगळ्यांना… आताही बिग बॉसमध्ये शांत डोकं ठेवून तू जी धमाल करतोयस ती आम्ही मस्त एंजॉय करतोय. जान्हवीसारख्या चिल्लर सदस्यांच्या कलकलाटाकडे लक्ष द्यायची गरजच नाही. तू बिनधास्त लढ, आम्ही आहोत तुला फायनलपर्यंत घेऊन जायला”, असं अमेय खोपकर म्हणाले आहेत.

‘बिग बॉस मराठी’च्या घरात मंगळवारी झालेल्या ‘सत्याचा पंचनामा’ या टास्कमध्ये अभिजीतच्या ‘बी’टीमने हुशारी दाखवल्यामुळे कोणालाही बीबी करन्सी जिंकता आली नाही. परिणामी दोन्ही गटांमध्ये टोकाचे वाद झाल्याचं पाहायला मिळालं होतं.