‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’साठी आमिरचा हटके लूक

या लूकसाठी आमिरने वेदनाही सहन केल्या.

aamir khan
आमिर खान

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान आपल्या प्रत्येक चित्रपटांमध्ये एका नव्या लूकमध्ये दिसतो. आपल्या भूमिकेसाठी नेहमीच नव्या गोष्टी अवलंबणारा आमिर आगामी ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’मध्ये हटके अंदाजात दिसणार आहे. कधी वजन कमी करून, कधी वजन वाढवून, वेगवेगळे हेअरस्टाईल करून आमिर नेहमीच भूमिकेला जिवंतपणा देण्याचे काम करतो. दमदार अभिनयासोबतच चित्रपटात वेगळ्या अंदाजात दिसण्यावरही तो खूप भर देतो. ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ चित्रपटातील आमिर खानचा हटके लूक तुम्हाला तोंडात बोट घालायला लावेल.

या चित्रपटासाठी आमिरने कान आणि नाक टोचले आहेत. यासाठी त्याला वेदनाही झाल्या. मात्र भूमिकेला पूर्ण न्याय देण्यासाठी आमिरने या वेदना सहन केल्या. सोशल मीडियावर आमिरचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. चित्रपटातील भूमिकेच्या मागणीनुसार त्याने कान आणि नाक टोचल्याचे सांगण्यात येत आहे. आमिरचा हटके लूक पाहिल्यानंतर चित्रपटातील त्याच्या भूमिकेविषयी प्रेक्षकांमध्ये अधिकच उत्सुकता लागून राहिली आहे.

वाचा : आता तेलुगू भाषिकही लुटू शकणार ‘तारक मेहता…’चा आनंद

‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’चे चित्रीकरण सध्या माल्टा येथे सुरु असून, तेथे काही दिवसांपूर्वी चाहत्यांना आमिरसोबत फोटो काढण्याची संधी मिळाली होती. डोळ्यावर मोठा चष्मा, मिश्या आणि विस्कटलेले केस असा त्याचा लूक या फोटोत पाहायला मिळाला होता. ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ चित्रपटातील काही अॅक्शन सीनचे चित्रीकरण माल्टामध्ये करण्यात आले आहेत. दोन महिन्यांमध्ये बांधण्यात आलेल्या एका मोठ्या जहाजावर या अॅक्शन सीनचे चित्रीकरण होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Amir khan changed his look for thugs of hindostan photo viral on social media

ताज्या बातम्या