आमिर खानच्या लेकीने शेअर केला फोटो, ‘तो’ बॉक्स पाहून नेटकऱ्यांनी विचारला सवाल

आयरा बॉयफ्रेण्ड नुपूरसह हिमाचल प्रदेशमधील काझा या गावात सुट्टी एन्जॉय करतेय.

ira-khan-amir-khan-daughter-viral-photo
(Photo-Instagram@khan.ira)

आमिर खानची मुलगी आयरा सध्या हिमाचल प्रदेशमध्ये बॉयफ्रेण्ड नुपूर शिखरेसोबत वेळ घालवतेय. नुकताच आयराने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत आयराने ‘शुभ सकाळ’ म्हणत चाहत्यांशी संवाद साधला आहे. मात्र या फोटोमुळे आता आयरा चांगलीच चर्चेत आली आहे. आयराच्या या फोटोमधील एका गोष्टीने नेटकऱ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. यावरून त्यांनी आयराला अनेक सवाल करत ट्रोलही केलंय.

आयराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या फोटोत ती एका बाकड्यावर बसलेली दिसतेय. या फोटोत आयरा तिच्या लाडक्या श्वानासोबत निवातं वेळ घालवताना आपण पाहू शकतो. मात्र या सर्वात नेटकऱ्यांचं लक्ष मात्र आयरच्या शेजारी ठेवलेल्या काही वस्तूंकडे गेलंय. या फोटोत आयराच्या शेजारी काही वस्तू दिसत असल्या तरी त्या ब्लर दिसत आहेत. अशातही तिच्या शेजारी असलेला एक बॉक्स सिगारेटचा असल्याचा तर्क नेटकऱ्यांनी लावला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

हे देखील वाचा: Raj Kundra Case: पोलीस चौकशी सुरु असतानाच राज कुंद्रावर भडकली शिल्पा शेट्टी; पोलिसांना म्हणाली…

आयराच्या या फोटोवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्याने आयराला ‘तू धुम्रपान करतेस का?’ असा प्रश्न विचारला आहे. तर दुसरा म्हणाला, “धुम्रपान करणं जीवावर बेतू शकतं.” आणखी एक युजर म्हणाला, “ते ब्लर केलेलं सिगारेटचं पॅकेट आहे का”
तर अनेक नेटकऱ्यांनी आयराला ती “कोणत्या ब्रॅण्डची सिगारेट आहे?” असा प्रश्न विचारला आहे.

ira-khan-insta
(Photo-Instagram@khan.ira)

हे देखील वाचा: “पटत नसेल तर अनफॉलो करा”; ब्रा स्ट्रॅपवरून ट्रोल करणाऱ्यांना ‘तारक मेहता…’मधील अभिनेत्रीचं उत्तर

दरम्यान एकीकडे आयरा बॉयफ्रेण्ड नुपूरसह हिमाचल प्रदेशमधील काझा या गावात सुट्टी एन्जॉय करतेय. तर दुसरीकडे आमिर खान लडाखमध्ये ‘लाल सिंह चड्ढा’ या सिनेमाचं शूटिंग करत आहे. आयरा आणि नुपूरने त्यांच्या व्हेकेशनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरलही झाले होते.

आयरा आणि नुपूर गेले काही वर्षे एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा ते दोघे एकमेकांसोबत स्पॉट होतात. काही महिन्यांपूर्वीच आयराने आपली रिलेशनशिप ओपन केली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Amir khan daughter ira khan share photo from himachal pradesh netizens spot pack of cigarettes asked her questions kpw

ताज्या बातम्या