…म्हणून आयरा खानला आईने दिलं होतं सेक्स एज्युकेशनवर पुस्तक

आयराने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या आईने हे पुस्तक दिल्याचे सांगितले आहे.

ira khan
आयराने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या विषयी सांगितले आहे.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची लाडकी लेक आयरा खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नसेल तरी ती नेहमीच चर्चेत असते. आयरा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. आयरा सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. इरा नुपुर शिखरेसोबत असलेल्या तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असते. आता इराने सोशल मीडियावर सेल्फ केअरवर चर्चा केली आहे. यावेळी तिने सांगितलं की तिच्या आईने तिला सेक्स एज्युकेशनवर पुस्तक दिलं होतं.

आयराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून ही माहिती दिली आहे. आयराची आई रिना दत्ताने तिला सेक्स एज्युकेश म्हणजेच शरीर संबंधांविषयी माहिती देणारं एक पुस्तक दिलं होतं. “मी यापूर्वी कधीही स्वत:च्या शरीराला इतकं निरखून पाहिलं नव्हतं. मला माझ्या आईनं सेक्स एज्युकेशनबद्दल माहिती देणारं एक पुस्तक दिलं होतं. या पुस्तकात स्वत:ला आरशात पाह असं सांगितलं होतं. पण मी असं काहीही केलं नाही. माझं शरीर बदललं आहे पण मला आणखी मोठं ध्येय गाठायचं आहे,” असे आयरा म्हणाली.

आणखी वाचा : “ए आर रहमान कोण आहे?, ‘भारतरत्न’ माझ्या वडिलांच्या पायाच्या नखाच्या बरोबरीचा”

ira khan
आयराने इन्स्टाग्राम स्टोरीवरून तिच्या आईने तिला सेक्स एज्युकेशनवर पुस्तक दिल्याचे सांगितले आहे.

 

आणखी वाचा : “ही त्याच्या कर्मांची शिक्षा,” पॉर्नोग्राफी प्रकरणात अटकेत असलेल्या राज कुंद्राला आणखी एक धक्का

आयराचे लाखो चाहते आहेत. आयरा बऱ्याचवेळा तिच्या मानसिक स्थितीबद्दल मोकळे पणाने बोलताना दिसते. या आधी आयराने तिच्या आई-वडिलांच्या घटस्फोटाचा तिच्यावर परिणाम झाल्याचं तिने सांगितलं होतं. नैराश्यात असलेल्या लोकांना मदत करण्यासाठी तिने अगास्तु फाऊंडेशन नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली होती. बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत ती या संस्थेत काम करते.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Amir khan s daughter ira khan s mother gave her sex education book dcp

ताज्या बातम्या