scorecardresearch

#Happy Birthday Amitabh Bachchan : कलाविश्वातून बिग बींवर शुभेच्छांचा वर्षाव

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दिक्षीतनेही बिग बींना शुभेच्छा दिल्या आहेत.

amitabh bachchan
अमिताभ बच्चन
१९७० च्या दशकाच्या सुरुवातीला भारतीय चित्रपटातील अॅग्री यंग मॅन अशी ओळख मिळविलेल्या अमिताभ बच्चन यांनी आज ७६ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. त्यामुळे आज त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतांना दिसून येत आहे. कलाविश्वातील अनेक सेलिब्रेटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बिग बींना शुभेच्छा दिल्या आहेत.

भोजपुरी चित्रपटातील अमिताभ बच्चन अशी ओळख असलेल्या रवी किशन याने ट्विटरच्या माध्यमातून बिग बींना शुभेच्छा दिल्या आहेत.यावेळी त्याने एका चित्रपटातील पोस्टरदेखील शेअर केलं आहे. तर अभिनेता परेल रावल यांनीदेखील अमिताभ यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दिक्षीतनेही बिग बींना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी तिने शुभेच्छा देताना अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलेल्या चित्रपटांचे पोस्टर शेअर केले आहेत.

शाहरुख खानच्या फॅन क्लबवरुन बिग बींना अनोख्या अंदाजात शुभेच्छा देण्यात आल्या आहे. अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर राज्य गाजविणाऱ्या बिग बींना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. तर दाक्षिणात्य चित्रपटातील सुपरस्टार धनुषनेही ट्विटरवरुन बिग बींना शुभेच्छा दिल्या आहेत.

रणबीर कपूर, रजनीकांत, विरेंद्र सेहवाग, सचिन तेंडूलकर या दिग्गजांनीदेखील बिग बींना शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Amitabh bachchan birthday wish to bollywood celebrities

ताज्या बातम्या