अमिताभ यांनी खरेदी केले ३१ कोटी रुपयांचे नवे घर, बिग बी झाले सनी लिओनीचे शेजारी

या प्रॉपर्टीसाठी अमिताभ यांनी ६२ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरली आहे.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सनी लिओनीने मुंबईत नवे घर खरेदी केल्याचे समोर आले होते. त्यापाठोपाठ आता बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी देखील मुंबईमध्ये नवे घर खरेदी केले आहे. बिग बींने खरेदी केलेले घर हे सनी लिओनीच्या घराच्या शेजारी आहे. या घराची किंमत तब्बल ३१ कोटी रुपये आहे. या घरासाठी अमिताभ यांनी ६२ लाख रुपये स्टॅम ड्युटी भरली असल्याचे समोर आले आहे.

अमिताभ बच्चन यांनी डिसेंबर २०२० मध्ये ही नवीन प्रॉपर्टी खरेदी केली आहे. या घराची किंमत ३१ कोटी रुपये आहे. पण एप्रिल २०२१मध्ये या घराचे रेजिस्टेशन करण्यात आला आहे. या प्रॉपर्टीसाठी अमिताभ यांनी ६२ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरली आहे. ‘अमर उजाला’ने दिलेल्या वृत्तानुसार, बिग बींनी खरेदी केलेल्या घराच्या शेजारी काही दिवसांपूर्वी सनी लिओनीने देखील येथे नवे घर खरेदी केले आहे.

Chupke Chupke: ‘जलसा’ हे घर कसं झालं? अमिताभ यांनी सांगितली ४६ वर्षांपूर्वीची गोष्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

Zapkey.comने दिलेल्या माहितीनुसार, अमिताभ यांनी खरेदी केलेले हे घर २७व्या आणि २८व्या मजल्यावर असून ५१८४ क्वेअर फीट आहे. तसेच त्यांना ६ गाड्या पार्किंगची जागा देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रिटी नवे घर खरेदी करताना दिसत आहेत.

अमिताभ यांचा ‘चेहरे’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेता इम्रान हाश्मी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच त्यांचा ‘झुंड’ हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या अमिताभ हे ‘गूड बाय’ चित्रपटाचे चित्रीकरण करत आहेत. त्यांचा आलिया भट्ट आणि रणबीर कपूरसोबत ‘बह्मास्त्र’ हा चित्रपट देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Amitabh bachchan buys duplex in mumbai worth rs 31 crore avb

Next Story
फेलिक्स बॉमगार्टनर
ताज्या बातम्या