‘जबडा तुटेल पण अर्थ समजणार नाही…’, जेव्हा बिग बी हिंदी बोलताना अडखळले

‘कौन बनेगा करोडपती १३’ या शोमध्ये बिग बी स्पर्धकांसोबत हिंदीतच संवाद साधत असतात

amitabh-bachchan

बिग बी अमिताभ बच्चन हे त्यांच्या भारदस्त आवाजासोबतच स्पष्ट उच्चार आणि हिंदी भाषेवरील प्रभूत्वासाठी ओळखले जातात. ‘कौन बनेगा करोडपती १३’ या शोमध्ये ते स्पर्धकांसोबत हिंदीतच संवाद साधत असतात. मात्र नुकत्याच प्रसारित झालेल्या एका एपिसोडमध्ये एका प्रश्नादरम्यान अमिताभ बच्चन चांगलेच अडखळले. असं असलं तरी बिग बींनी ही परिस्थिती त्यांच्या विनोदी बुद्धीने हाताळली.

नुकत्याच पार पडलेल्या ‘कौन बनेगा करोडपती१३’च्या भागात हिमाचल प्रदेशमधील मंडी इथल्या अनिल गुप्ता यांना हॉट सीटवर बसण्याचं भाग्य लाभलं होतं. अनिल गुप्ता यांनी २० हजारांसाठी विचारलेल्या प्रश्नालाच पहिली लाइफ लाईन वापरली. गुप्ता यांना भारतीय पुराणाशी निगडीत एक प्रश्न विचारण्यात आला होता. ज्याचं उत्तर त्यांना येत नव्हतं. यावर त्यांनी ‘फ्लिप द क्वेशन’ म्हणजेच प्रश्न बदलण्याची लाइफ लाइन वापरली. यानंतर बिग बींनी पुढील प्रश्न वाचला. “यापैकी कोणता शब्द प्राचीन इजिप्तमधील सम्राटांसाठी वापरला जातो?” असा हा प्रश्न होता. तर ‘फॅरो’ असं या प्रश्नाचं योग्य उत्तर असून गुप्ता यांनी योग्य उत्तर देत २० हजार जिंकले.

या पुढील प्रश्नाचही गुप्ता यांनी योग्य उत्तर दिलं. या वेळी या उत्तराबद्दल सविस्तर सांगत असताना बिग बी एका हिंदी वाक्यात अडखळले. यावेळी स्वत:च्या अडखळण्यावर त्यांनी स्वत:च विनोद केला. “कोणाला हा शब्द समजाण, शब्द बोलण्यात जबडा तूटून जाईल पण कुणाला याचा अर्थ समजणार नाही” असं म्हणत बिग बींनी विनोद करत परिस्थिती सांभाळली.

कौन बनेगा करोडपती १३’च्या मंचावर बिग बी अमिताभ बच्चन कायमच स्पर्धकांना प्रोत्साहन देत असतात. खेळा दरम्यान त्यांचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करत असतात. यावेळी सेटवर विनोद करत ते खेळीमेळीचं वातावरण राखण्याचा प्रयत्न करताना दिसतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Amitabh bachchan fumbles while reading a line in kaun banega karodpati kpw

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या