बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांचे लाखो चाहते आहेत. बिग बी हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. यावेळी अमिताभ हे क्रिप्टोकरन्सीमुळे चर्चेत आले आहेत. प्रत्येक व्यक्ती ही क्रिप्टोमध्ये कशी गुंतवणुक करायची हे समजून घेत असताना अमिताभ यांनी तर कोटी रुपये कमावले आहेत.

इकनॉमिक्स टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, २०१५ मध्ये अमिताभ आणि त्यांचा मुलगा अभिषेकने जवळपास $250,000 म्हणजेच जवळपास १.६ कोटी रुपयांची गुंतवणूक सिंगापूरमध्ये स्थित असलेल्या Meridian Tech Pte या कंपनीत केली होती. तर, अडीच वर्षाच्या या काळात अमिताभ आणि अभिषेकने यातून $17.5 मिलियन म्हणजेच जवळपास ११२ कोटी रुपये कमावले.

Vodafone Idea (VIL) , FPO, public investors
‘व्होडा-आयडिया’ची सुकाणू गुंतवणूकदारांकडून ५,४०० कोटींची निधी उभारणी, आजपासून प्रत्येकी १०-११ रुपयांनी समभाग विक्री
bse listed companies marathi news
गुंतवणूकदार ४०० लाख कोटींचे धनी
loss firms donate electoral bonds
तोट्यात असणाऱ्या ३३ कंपन्यांकडून ५४२ कोटी रुपयांचे रोखे दान, एकट्या भाजपाला मिळाले तब्बल…
SME, small and medium enterprises, initial public offerings, ipo, Raise, Rs 5579 Crore, Current Financial Year, Investors Profit, finance, financial knowledge, finance year end,
‘एसएमई आयपीओं’च्या मंचावर विक्रमी ५,५७९ कोटींची निधी उभारणी

Ziddu या वेबसाइटनुसार, हे एक ब्लॉकचेन रीसर्च कंपनी आहे, जी मायक्रो-लेन्डींग आणि वेअरहाऊस फायनान्सिंगसाठी डिसेन्ट्रलाइज अॅप्लिकेशन विकसित करण्याचे काम करते.

फर्स्टपोस्टच्या माहितीनुसार, अमिताभ यांच्या इतर दोन गुंतवणुकीमुळेही त्यांना चांगला फायदा झाला होता. या शिवाय २०१३ मध्ये, त्यांनी JustDial मध्ये गुंतवणुक केली. त्यांनी त्यावेळी फक्त ६ लाख २७ हजार रुपयांची गुंतवणुक केली होती. तर अवघ्या ४ महिन्यात त्यांनी यातून ७ कोटी रुपये कमावले.

आणखी वाचा : अक्षयचा पांढऱ्या दाढीतील फोटो शेअर करत ट्विंकल म्हणाली, “आपला माल तर…”

क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय?

क्रिप्टोकरन्सी अर्थात आभासी चलन हे संगणकीय अल्गोरिदमच्या आधारे निर्माण करण्यात आलेले चलन आहे. आभासी चलन ही संकल्पना आता जवळपास दशकभर जुनी झाली आहे. त्यामुळे आभासी चलन म्हणजे काय, हे बहुतेकांना माहीत असेलच. आभासी या चलनाला भौतिक रूप नसते. मात्र, तुम्ही आर्थिक देवाणघेवाणीसाठी ते वापरू शकता. २००९ मध्ये सातोशी नाकामोतो नावाच्या एका अभियंत्याने ‘बिटकॉइन’ची संकल्पना जन्माला घातली. एका संगणकीय प्रोग्रॅममधील गणितीय आकडेमोड करून ‘बिटकॉइन’ अस्तित्वास आले. त्यानंतर गेल्या दशकभरात शेकडो प्रकारच्या ‘क्रिप्टोकरन्सी’ संगणकीय जगात निर्माण झाल्या.

आणखी वाचा : रस्त्यावरील मुलांना ५०० च्या नोटा वाटणे नेहा कक्करच्या आले अंगाशी, पाहा काय घडले

अशा प्रकारच्या आभासी चलनाद्वारे केलेले आर्थिक व्यवहार अतिशय गोपनीय असतात. या चलनाच्या व्यवहारांसाठी कोणत्या बँकेशी संलग्न राहण्याची आवश्यकता नाही. विकेंद्रित व्यवस्था असल्याने या आभासी चलनावर कोणा एका कंपनीची वा देशाची मक्तेदारीही नाही. कोणत्याही देशाच्या सीमेचे बंधन नसल्याने आणि कोणत्याही स्वरूपाचा कर त्यांना लागू होत नसल्याने गेल्या दशकभरात आभासी चलनाचा वापर वाढत चालला आहे. त्यामुळे गेल्या दशकभरात या आभासी चलनांची उलाढाल अब्जावधी डॉलरच्या घरात पोहोचली आहे.