बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन हा सध्या त्याचा आगामी दसवी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर अमिताभ बच्चन यांना फारच आवडला आहे. नुकतंच अमिताभ बच्चन यांनी दसवी चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अभिषेक बच्चन याची प्रमुख भूमिका असलेला दसवी चित्रपटाच्या ट्रेलरची चर्चा सुरु आहे. नुकतंच अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटाचा ट्रेलर पाहिला. त्यावर त्यांनी ट्विटर आणि ब्लॉगमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. याद्वारे त्यांनी त्यांना अभिषेकचा किती अभिमान वाटतो हे सांगितले आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांच्या एका कवितेचा दाखला देत त्याचे कौतुक केले आहे. त्यावेळी त्यांनी अभिषेकला आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले. अमिताभ यांची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. वडिलांच्या या पोस्टवर अभिषेकनेही कमेंट केली आहे.

uddhav balasaheb thackeray criticized mahayuti candidate sandipan bhumre
मद्य परवान्यांचा विषय ठाकरे गटाकडून ऐरणीवर; उमेदवारी जाहीर होताच भुमरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न
Chandrashekhar Bawankule,
धैर्यशील मोहिते पाटलांच्या राजीनाम्यावर भाजपाची पहिली प्रतिक्रिया; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “शरद पवारांचा…”
kangana ranaut on rahul gandhi and sonia gandhi
‘राहुल गांधी आईच्या महत्त्वाकांक्षेला बळी पडलेला मुलगा’, ३ इडियट्स चित्रपटाचं उदाहरण देत कंगना रणौत म्हणाली…
randeep surjewala made controversial remarks on hema malini
हेमा मालिनी यांच्याबाबत रणदीप सुरजेवालांचं वादग्रस्त वक्तव्य, कंगनाची तिखट शब्दांत प्रतिक्रिया, “द्वेष आणि तिरस्कार..”

अभिषेक बच्चनच्या दसवी चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी वडील हरिवंशराय बच्चन यांची एक कविता ट्विटरवर शेअर केली आहे. माझ्या लाडक्या मुला, तू माझा मुलगा आहेस म्हणून तू माझा उत्तराधिकारी होऊ शकत नाहीस. पण जो माझा उत्तराधिकारी असेल तो माझा मुलगा नक्की असेल – हरिवंशराय बच्चन, अशी पोस्ट अमिताभ यांनी शेअर केली आहे. यासोबत त्यांनी अभिषेक तू माझा उत्तराधिकारी आहेस, मी बोललो म्हणजे बोललो, असेही लिहिले आहे.

अमिताभ यांच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहे. यावर अभिषेकनेही वडीलांवरील प्रेम व्यक्त करत ‘माझे तुमच्यावर प्रेम आहे आणि ते कायम राहिलं, असे म्हटले आहे.

“काहीवेळा एक छोटीशी ठिणगीही…”, नागाचैतन्यला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलेल्या समांथाची पोस्ट चर्चेत

दरम्यान नुकतंच अभिषेक बच्चनच्या दसवी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिषेक बच्चन हा मुख्यमंत्र्यांची भूमिका साकारताना पाहायला मिळत आहे. गंगाराम चौधरी असे या मुख्यमंत्र्यांच्या नाव आहे. तो एक भ्रष्ट मुख्यमंत्री असून तुरुंगात असल्याचे पाहायला मिळत आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर २ मिनिटे ३७ सेकंदांचा आहे. या ट्रेलरची सुरुवात गंगाराम म्हणजेच अभिषेक बच्चन तुरुंगात गेल्याने होते. तुरुंगात गंगारामला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. गंगारामचे शिक्षण हे केवळ आठवीपर्यंतच झालेले असते. त्यानंतर तो तुरुंगात राहून कशाप्रकारे १० वी पर्यंत उत्तीर्ण होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या चित्रपटात अभिषेकसोबत निम्रत कौर आणि यामी गौतम झळकणार आहे. यात निम्रत ही त्याच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. तर यामी ही कठोर आयपीएस अधिकारी असल्याचे दाखवण्यात आले आहे.