Amitabh Bachchan Praises cricketer Vaibhav Sooryavanshi : क्रिकेटची भारतात प्रचंड क्रेझ आहे हे सर्व जानतातच. त्यामुळे अगदी लहान मुलं ते ज्येष्ठ व्यक्ती, सामान्य माणूस ते कलाकार, नेते मंडळी सगळेच हा खेळ खूप आवडीने पाहत असतात. अनेक जण क्रिकेट आणि त्यांच्या आवडत्या क्रिकेटपटूबद्दल बोलताना दिसतात. सध्या भारतात आयपीएल सुरू असल्याने सोशल मीडियासह सर्वत्र त्याचीच क्रेझ आहे. त्यात गेल्या काही काळापासून युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशी याने त्याच्या कामगिरीने अनेकांना चकीत केलं आहे. यामगचं कारण म्हणजे वय जरी लहान असलं तरी किर्ती महान आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
वैभवचं म्हणूनच या क्षेत्रातील अगदी जाणती मंडळी ते आपल्या खेळाने एक काळ गाजवलेला संचिन तेंडुलकरही कौतुक करताना दिसतो. अशातच आता यात भर म्हणून बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनासुद्धा वैभवचं कौतुक करण्याचा मोह आवरलेला नाही. गेल्या दोन-चार दिवसात तर या अवघ्या १५ वर्षीय क्रिकेटपटूने अनेकांचं विशेष लक्ष वेधलं आहे. शुक्रवारी झालेल्या राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात त्याने ४७ चेंडूत ९६ धावा केल्या होत्या. पण, शतकाच्या एवढ्या जवळ असताना तो बाद झाला. यापूर्वीसुद्धा सनराइजर्स हैदराबादबरोबरच्या सामन्यात त्याने २९ चेंडूत ९७ धावा केल्या होत्या आणि शतकाच्या इतक्या जवळ असताना प्रफुल हिंगेने त्याची विकेट घेतली. पण, त्याच्या या दोन्ही साम्यांतील कामगिरीचं अनेकांनी कौतुक केलं.
अमिताभ बच्चन यांनी केलं वैभवचं कौतुक
अमिताभ बच्चन यांनी आता एक्सवर पोस्ट करत वैभवचं कौतुक केलं आहे आणि ते १५ वर्षांचे असताना त्यांना विटू दांडूसुद्धा खेळता यायचं नाही असं म्हटलं आहे. बिग बी या पोस्टमधून म्हणाले, “सूर्यवंशी – १५ वर्षांचा अद्भूत सूर्या. या वयात तर मी विटी दांडूसुद्धा नीट खेळत नव्हतो.”
T 5756(i) –
— Amitabh Bachchan (@SrBachchan) May 29, 2026
Sooryavanshi – १५ साल की उम्र का अद्भुत सूर्या ।
इस उम्र में तो हम बंटों और गुल्ली डंडा भी ठीक से नहीं खेल पा रहे थे !!
बिग बी अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि आजुबाजूला घडत असलेल्या घडामोडींबद्दलची त्यांची मतं ते व्यक्त करत असतात. अनेकदा यामुळे ते चर्चेतही असतात. अशातच आता त्यांनी यामार्फत आघीडीचा खेळाडू आणि सर्व जण म्हणतात तसा उद्याचा क्रिकेटमधील सुपरस्टार वैभव सूर्यवंशीचं कौतुक केलं आहे.
दरम्यान, वैभव खेळत असलेला राजस्थान रॉयल्स हा संघ जरी यंदाच्या आयपीएल टूर्नामेंटमधून बाहेर झाला असला तरी वैभवने मात्र त्याच्या कामगिरीने देशभरातीलच नव्हे तर जगातील अनेकांचं लक्ष वेधलं आहे. त्यामुळे येत्या काळात त्याला क्रिकेटच्या वेगवेगळ्या फॉर्मेटमधून खेळताना पाहण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत.
