बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांची लोकप्रियता आजही कायम आहे. १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला भारतीय चित्रपटातील ‘अॅग्री यंग मॅन’ अशी ख्याती त्यांनी आपल्या भूमिकांतून मिळवली. अमिताभ यांनी चार दशकांहून अधिक मोठ्या कारकीर्दीत १८० हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. अमिताभ हे भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील सर्वात महान आणि प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

११ ऑक्टोबर १९४२ मध्ये उत्तर प्रदेशच्या अलाहाबादमध्ये बिग बी यांचा जन्म झाला. जन्मापूर्वी त्यांचे नाव इन्कलाब श्रीवास्तव असे होते. बिग बींनी ‘कौन बनेगा करोडपती १३’मध्ये हा खुलासा केला की, ‘१९४२ मध्ये त्यांची आई आठ महिन्यांच्या गर्भवती होत्या. त्यावेळी त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या मिरवणुकीत भाग घेतला. जेव्हा कुटुंबातील माणसांना या विषयी कळाले की त्या घरी नाही आणि मिरवणुकीत भाग घेण्यासाठी गेल्या आहेत, तेव्हा घरच्यांना राग आला आणि त्यांनी अमिताभ यांच्या आईला घरी नेले. त्यावेळी भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या भाग असलेल्या एका व्यक्तीने त्यांच्या आईला सुचवले की तुमच्या मुलाचे नाव ‘इन्क्लाब’ ठेवा. त्यानंतर अमिताभ यांच्या वडिलांचे जवळचे मित्र सुमितानंदन पंत हे अमिताभ यांच्या नामकरण समारंभासाठी घरी आले होते. त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि मला अमिताभ नाव दिले, असे अमिताभ यांनी सांगितले.

आणखी वाचा : बिग बींनी जलसाजवळील जागा SBI ला दिली भाडेतत्वावर, भाडं ऐकून येईल चक्कर

अमिताभ म्हणजे असा प्रकाश जो कधीही कमी होत नाही. त्यामुळे बिग बींचं अमिताभ हे नामकरण करण्यात आलं. अमिताभ बच्चन यांच्या आईमुळे त्यांची पावलं रंगभूमीकडे वळली आणि याच जोरावर ते मुंबईमध्ये आले. या कालावधीमध्ये त्यांना वडीलांकडून साहित्याचाही मोठा वारसा मिळाला होता.

आणखी वाचा : “जेव्हा माझ्या ११ वर्षाच्या मुलाचे निधन झाले तेव्हा शाहरूख…”, शेखर सुमनचे ट्वीट व्हायरल

अमिताभ यांनी मुंबई गाठल्यानंतर ‘भुवन शॉ’, ‘सात हिंदुस्तानी’ हे त्यांच्या कारकीर्दीतले अगदी सुरुवातीचे चित्रपट होते. त्यानंतर ‘जंजीर’, ‘कुली’, ‘लावरिस’, ‘त्रिशूल’, ‘खून-पसीना’, ‘कालिया’, ‘अग्नीपथ’, ‘काला पथ्थर’, ‘डॉन’ या चित्रपटांमध्ये ते झळकले. विशेष म्हणजे हे सारेच चित्रपट त्याकाळी प्रचंड हिट ठरले. या सगळ्या चित्रपटांमधून वेळोवेळी बदलती समाजव्यवस्था, राजकारण, समाजकारण, आणि वाढती गुन्हेगारी याचे चित्रण झाले. त्यामुळे अमिताभ हिंदी चित्रपटसृष्टीतील एका नव्या प्रवाहाला निमित्त ठरले. ‘चुपके-चुपके’, ‘नमक-हलाल’, ‘मिली’सारखे वेगळे चित्रपटही त्यांनी केले. तर ‘सिलसिला’, ‘कभी-कभी’, ‘मुकद्दर का सिकंदर’ अशा चित्रपटांमधून प्रेमाची नवी परिभाषा उलगडली.

आणखी वाचा : रकुल प्रीत सिंगने ‘या’ बॉलिवूड अभिनेत्यासोबत फोटो शेअर करत दिली प्रेमाची कबुली

चित्रपट गाजविणाऱ्या अमिताभ यांना ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटाने पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला.त्यानंतर १९८४ मध्ये ‘पद्मश्री’, २००१ मध्ये ‘पद्मभूषण’ आणि २०१५ मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. तसंच चौदा फिल्मफेअर पुरस्कारही त्यांच्या नावे आहे. अभिनयाखेरीज पार्श्वगायक, चित्रपटनिर्माते आणि टीव्ही कार्यक्रम निर्माते म्हणूनही बच्चन यांनी काम केले आहे. १९८४ ते १९८७ या काळात ते लोकसभेवर निवडून गेले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan real name he reveled the story behind his name dcp
First published on: 10-10-2021 at 22:00 IST