अमिताभ बच्चन जलसावर होणाऱ्या वटवाघूळाच्या हल्ल्यामुळे त्रस्त; म्हणाले “तिसऱ्या मजल्यावरील माझ्या खोलीत…”

बिग बींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये याबाबत सांगितले आहे.

Amitabh Bachchan, Amitabh Bachchan tweet, bat attack, bat attack in jalsa,

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते त्यांच्या खासगी आयुष्याविषयी तसेच त्यांच्या चित्रपटातील किस्से सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतात. नुकताच बिग बींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये ‘जसला’ बंगल्यात वटवाघूळांनी हल्ला केल्याचे सांगितले आहे.

‘आणि त्यानंतर एक वटवाघूळ समोर दिसलं. सर्व खबरदारी घेऊनही वटवाघूळ घरात घुसले. वटवाघूळांना घराबाहेर काढण्यासाठी सर्वजण आवश्यक ती उपकरणे गोळा करत होते. जेणेकरुन वटवाघूळांपासून सुटकारा मिळेल आणि घाबरलेल्या कुटुंबीयांना दिलासा मिळेल. मला ईएफ ब्रिगेडचा कोणताही सल्ला नकोय. पण जर तुमच्याकडे काही नवे असेल ज्याचा वापर आम्ही केलेला नाही तर ते नक्की सांगा. आम्ही धूर केला, संपूर्ण घर सॅनिटाइझ केले, इलेक्ट्रॉनिक रिपेलंट गॅझेट्सचा वापर केला आणि सगळीकडे निलगिरीचे तेल शिंपडले होते’ असे बीग बींनी ब्लॉकमध्ये म्हटले.

त्यानंतर अमिताभ यांनी एक ट्वीट केले. या ट्वीटमध्ये त्यांनी, ‘सध्याची ब्रेकिंग न्यूज, तुमचा विश्वास बसणार नाही. जलसा बंगल्यातील माझ्या खोलीत वटवाघूळ आले होते. तेही तिसऱ्या मजल्यावर. अथक प्रयत्नानंतर त्याला घराबाहेर काढले’ असे म्हटले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Amitabh bachchan reveals bat attack in jalsa has left his family worried avb

Next Story
नाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं!
ताज्या बातम्या