बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना लवकरच ‘गुड बाय’ चित्रपटात दिसणार आहेत. सध्या या चित्रपटाच्या शूटिंगसाठी दोघंही हरिद्वारला आहेत. अमिताभ बच्चन सोशल मीडियावर बरेच सक्रीय असतात. त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर ‘गुडबाय’च्या सेटवरील एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ते रश्मिकासोबत दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर या फोटोची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या या फोटोमध्ये रश्मिकाच्या चेहऱ्यावरही गोड हसू दिसत आहे आणि बिग बी देखील तिच्याकडे पाहून हसताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना अमिताभ बच्चन यांनी त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘पुष्पा…’ अमिताभ बच्चन यांच्या कॅप्शनमुळे अनेक युजर्सनी मजेदार कमेंट केल्या आहेत.

आणखी वाचा- “तिथे प्रमोशन केल्यानं…” ‘द कपिल शर्मा शो’बाबत जॉन अब्राहमचं धक्कादायक विधान

रश्मिका मंदाना तिचा चित्रपट ‘पुष्पा’मुळे सातत्यानं चर्चेत आहे. लवकरच ती अमिताभ बच्चन यांच्या ‘गुड बाय’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. जेव्हा अमिताभ यांनी रश्मिकासोबचा फोटो शेअर करताना ‘पुष्पा’ असं कॅप्शन दिल्यानंतर अनेक युजर्सनी त्यावर कमेंट करताना ‘ती पुष्पा नाही तर श्रीवल्ली आहे.’ असं म्हटलं आहे.

आणखी वाचा- महाराष्ट्राचं दुर्दैव! प्रवीण तांबेचा चित्रपट तमिळ- तेलुगू भाषेत… पण मराठीत नाही

नेटकऱ्यांनी अमिताभ बच्चन यांना रश्मिकानं ‘पुष्पा’ चित्रपटात श्रीवल्लीची भूमिका साकारली होती याची आठवण करून दिली. दरम्यान रश्मिका या चित्रपटाची असल्यानं अमिताभ बच्चन यांनी या फोटोला असं कॅप्शन दिलं असल्याचंही काही चाहते बोलताना दिसत आहेत.

अमिताभ बच्चन यांनी रश्मिकाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तिने हा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत त्यांचे आभार मानले आहेत. याशिवाय रश्मिकानंही तिच्या इन्स्टाग्रामवर हाच फोटो पोस्ट करत अमिताभ बच्चन यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan shared picture with rashmika mandanna user find mistakes in post mrj
First published on: 31-03-2022 at 16:11 IST