छोट्या डॉनला पाहा म्हणणाऱ्या यूजरला दिले बिग बींनी उत्तर

शेअर केला व्हिडीओ..

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ते त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांसोबच शेअर करताना दिसतात. त्याचबरोबर ते त्यांना टॅग केले काही मजेशीर व्हिडीओ देखील शेअर करताना दिसतात. असाच एक व्हिडीओ अमिताभ यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकला डॉन चित्रपटातील गाण्यावर नाचताना दिसत आहे.

ट्विटरवर एका यूजरने लहान मुलाचा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये चिमुकला अमिताभ यांचा हिट चित्रपट डॉनमधील ‘खईके पान बनारस वाला’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या ट्विटर यूजरने हा व्हिडीओ शेअर करत ‘छोट्या डॉनला पाहा सर’ असे म्हणत अमिताभ यांना टॅग केला होता.

त्या लहान मुलाचा व्हिडीओ बिग बींना आवडला असून बिग बींनी देखील शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत बिग बींनी ‘हाहाहा… बिचारा.. पण किती क्यूट आहे’ असे म्हटले आहे. सध्या सोशल मीडियावर या चिमुकल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Amitabh bachchan shared the cute baby dance of a kid avb

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन