बिग बी अमिताभ बच्चन सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहणं बिग बींना चांगलंच आवडतं. ७८ वर्ष वय झालं असलं तरी सध्याच्या तरुण पिढीला टक्कर देत बिग बी सोशल मीडियावर सक्रिय राहण्याचा प्रयत्न करतात. नुकतंच त्यांनी त्यांची नात नव्या नवेली नंदाचा एका व्हिडीओ शेअर केला आहे. यात नव्या पिआनो वाजवताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

नव्याचा पिआनो वाजवतानाचा एक व्हिडीओ अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करतेवेळी अमिताभ बच्चन यांच्यासाठी अभिमानास्पद क्षण असल्याचे सांगितले आहे. हा व्हिडीओ शेअर करतेवेळी कॅप्शन देतेवेळी बिग बी म्हणाले, “नव्या पिआनो वाजवत आहे. नातीला पिओना वाजवताना बघणं, हा तिच्या आजोबासाठी अभिमानास्पद क्षण आहे. ती स्वतः ते शिकली आहे. त्यात तिने डिजीटल पदवी प्राप्त केली,” असे अमिताभ बच्चन यांनी सांगितले.

“नव्याने स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे. गरजू महिलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करतेय. वडिलांच्या व्यवसायात हातभार लावते. त्यासोबतच माझा मोबाईल आणि कॉम्प्युटरच्या सर्व समस्या लगेच सोडवते. माझे तुझ्यावर मनापासून प्रेम आहे,” असे कॅप्शन अमिताभ बच्चन यांनी दिले आहे. तसेच “कोण म्हणतं की मुली या घराच्या संपत्ती नसतात?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

नव्याचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिचे कौतुक केले आहे. तसेच बिग बींच्या कौतुकामुळे ती फार खूश झाली आहे. त्यासोबतच सिनेसृष्टीतील इतरांनीही नव्याची स्तुती केली आहे.

बिग बींनी नुकतच ‘गुड बाय’ या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलंय. सध्या ते ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात होस्टच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यासोबतच ‘चेहेर’, ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘झुंड’ या सिनेमांमध्ये ते झळकणार आहेत.