बिग बी फ्रेंच दाढी का ठेवतात? ही केवळ त्यांची फॅशन नव्हे तर यामागे एक रहस्य आहे…

बिग बी गेल्या अनेक वर्षांपासून फ्रेंच कट दाढी ठेवत असल्याचं तुमच्या निदर्शनास आलं असेल. पण त्यांची ही स्टाइल केवळ फॅशन नाही, तर यामागे एक रहस्य आहे.

amitabh-bachchans-french-beard-look

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे त्यांच्या अभिनया व्यतिरिक्त आपल्या लुकमुळे सुद्धा ते साकारत असलेल्या भूमिका जिवंत करत असतात. बिग बी गेल्या अनेक वर्षांपासून फ्रेंच कट दाढी ठेवत असल्याचं तुमच्या निदर्शनास आलं असेल. पण बिग बी ही फ्रेंच कट दाढी केवळ फॅशन म्हणून ठेवत नाहीत, तर यामागे एक रहस्य आहे. हा किस्सा त्यांच्या चित्रपटाच्या संबंधित आहे. बिग बींनी स्वतः हा किस्सा शेअर केलाय.

‘रंग दे बसंती’, ‘भाग मिल्खा भाग’ अशा सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी नुकतंच सोशल मीडियावर एक रील शेअर केलाय. या रीलमध्ये ओमप्रकाश यांचं नुकतंच प्रकाशित झालेल्या ‘द स्ट्रेंजर इन द मिरर’ या पहिल्या पुस्तकाचे पान दिसत आहे. यात अमिताभ बच्चन यांनी स्वतः लिहिलेला किस्सा दाखवण्यात आलाय. यात अमिताभ बच्चन यांनी लिहिलंय की, दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश यांनी त्यांच्या ‘अक्स’ चित्रपटात त्यांना फ्रेंच कट दाढी ठेवण्यासाठी सांगितलं होतं. तेव्हापासून ते आतापर्यंत ते याच डिझाइनची दाढी ठेवत आले आहेत. या रीलमधल्या व्हिडीओमध्ये बॅकग्राऊंडला ‘बंदा ये बिंदास है’ हे गाणं ऐकायला मिळतं. हे गाणं त्यांच्या याच ‘अक्स’ चित्रपटातलं आहे. अमिताभ बच्चन यांच्या फ्रेंच कट दाढीमागचं रहस्य उघड करण्यासाठी हा रील शेअर करताना दिगदर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी एक कॅप्शन देखील लिहिलीय. यात त्यांनी लिहिलंय, “डेब्यू करणाऱ्या एका दिग्दर्शकाला स्क्रीनवर यापेक्षा आणखी जास्त लेजेंड्री सुरूवात मिळू शकते का? धन्यवाद अमिताभ बच्चन.”

बॉलिवूडते दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश शर्मा यांच्या ‘अक्स’ या चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन यांनी काम केलंय. या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्या पात्रानुसार फ्रेंच कट दाढीमध्ये ही भूमिका आखली गेली होती. आपल्यापेक्षा अनुभवाने मोठा असलेल्या कलाकाराला हे सांगताना दिग्दर्शक राकेश यांना अवघडल्या सारखं जात होतं. अमिताभ बच्चन यांनी ‘अक्स’ चित्रपटाची स्क्रीप्ट जहाजमध्ये बसून वाचायला घेतली होती. स्क्रीप्ट वाचून अमिताभ बच्चन यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी दिग्दर्शक राकेश खूपच उत्साहित होते. काहीसे चिंतेत ही होते.

ज्यावेळी बिग बींनी स्क्रीप्ट वाचली त्यावेळी त्यांनी विचारलं, “ही स्क्रीप्ट लिहीत असताना काय प्यायले होते?” दिग्दर्शक राकेश म्हणाले, “कोक आणि रम”. त्यावर अमिताभ बच्चन यांनी स्क्रीप्ट वाचून भूमिका करण्यासाठी होकार दिला. त्यानंतर त्यांनी स्क्रीप्टनुसार आपला लुक देखील बदलला. त्यांना हा फ्रेंच कट दाढीमधला लुक इतका आवडला की आतापर्यंत त्यांनी हाच लुक ठेवलाय. ‘अक्स’ चित्रपटाला रिलीज होऊन १४ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बिग बींनी हा किस्सा शेअर केला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Amitabh bachchans french beard look goes to rakesysh omprakash mehra prp

ताज्या बातम्या