बॉलिवूडचे दिग्गज कलाकार अमिताभ बच्चन यांच्या ‘प्रतीक्षा’ या बंगल्याची तोडफोड करण्यात येणार आहे. रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी त्यांच्या बंगल्याचा काही भाग तोडण्यात येणार आहे. ‘प्रतीक्षा’चा भिंत तोडण्याची नोटीस पालिकेने २०१७ मध्ये बजावली होती. बीएमसी अधिकाऱ्यांनी ‘प्रतीक्षा’च्या तोडल्या जाणाऱ्या भागाला निशान करण्यास सांगितले आहे. ‘प्रतीक्षा’ला लागून असलेला हा रस्ता इस्कॉन मंदिराकडे जातो आणि त्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी बंगल्याची भिंत पाडली जाणार आहे.

रस्ता रुंदीकरणासाठी बीएमसीने २०१७ मध्ये अमिताभ बच्चन यांना नोटीस बजावली होती. अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याला लागून असलेल्या प्लॉटची भिंत पाडली आणि तिथे गटार बनवण्यात आली होती, परंतु अमिताभ यांच्या बंगल्यात छेडछाड केली गेली नाही. नोटीस असूनही अमिताभ यांच्या बंगला सोडण्यावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कोणते ही वक्तव्य केलेले नाही.

आणखी वाचा : आमिर आणि किरण रावच्या घटस्फोटावर राखी सावंत म्हणाली…

अमिताभ यांच्या या बंगल्याच्या जवळ असलेल्या रस्त्याची रुंदी ही कमी आहे. त्यामुळे तिथे नेहमीच ट्रॅफिक होण्याची परिस्थिती असते. या रस्त्यावर रहदारी असते आणि याच रस्त्यावर २ शाळा, एक रुग्णालय आणि इस्कॉनचे मंदिर तसेच मुंबईतील अनेक स्मारकेही आहेत.

आणखी वाचा : शाहरुख खानने चक्क आलिया भट्टकडे मागितलं काम; रिट्विट करत म्हणाला, वचन देतो…

अमिताभ हे त्यांच्या संपूर्ण कुटुंबासोबत जलसा या बंगल्यात राहतात. मात्र, कधी कधी ते त्यांच्या कुटुंबासोबत थोडा वेळ व्यथित करण्यासाठी ‘प्रतीक्षा’ या बंगल्यावर येतात. या बंगल्यात त्यांनी त्यांच्या आई-वडिलांसोबत बराच वेळ व्यथित केला आहे. ‘प्रतीक्षा’ हा अमिताभ बच्चन यांचा मुंबईतील पहिला बंगला आहे.’