जगप्रसिद्ध सरोद वादक पद्मविभूषण उस्ताद अमजद अली खान यांनी मुंबईत ‘मॉर्निंग राग’ या विशेष सरोद मैफलीचे आयोजन केले होते. मुंबईतील प्रसिद्ध रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये हा कॉन्सर्ट झाला. यावेळी उस्ताद अमजद अली खान यांनी आपल्या सरोद वादनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी प्रसिद्ध कवी आणि चित्रपट निर्माते गुलजारही उपस्थित होते. गुलजार यांनी अमजद अली खान यांच्यासाठी एक डॉक्युमेंटरी फिल्मही बनवली असून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी दिलेल्या एका मुलाखतीत खान आडनावामुळे येणाऱ्या अनेक अडचणींविषयी उस्ताद अमजद अली खान यांनी वक्तव्यं केले आहे.

उस्ताद अमजद यांनी नुकतीच ‘नवभारत टाइम्स’ला मुलाखत दिली आहे. उस्ताद अमजद अली खान यांना त्यांच्या मुस्लिम आडनावामुळे त्यांना ब्रिटनचा व्हिसा नकारण्यात आला. यानंतर आपली निराशा व्यक्त करत त्यांनी आपले नाव बदलून सरोद ठेवायचे सांगत म्हणाले, “२१ व्या शतकात सर्व काही शांतपणे आणि सुरळीत होईल, असे वाटत होते. शिक्षणाने माणसे हुशार होतील असे वाटतं होते. पण शाळा हा धंदा बनला आहे. कदाचित त्यामुळेच शिक्षण आपल्याला प्रेमाने वागणं शिकवू शकले नाही. आजही धर्म आणि रंगाच्या आधारावर लोकांमध्ये भेदभाव केला जातो. जगातील लोक शिक्षणामुळे प्रेमळ होण्याऐवजी अधिक निर्दयी झालेत.”

Shrikant Shinde, Sanjay Raut, Shrikant Shinde news,
श्रीकांत शिंदे म्हणतात, संजय राऊतांच्या उपचाराचा खर्च आम्ही करू
Sarbajeet singh
सरबजित सिंगच्या मारेकऱ्याची पाकिस्तानात हत्या; मुलगी म्हणते, “हा न्याय…”
Man Stabbed to Death for Confronting Women Smoking in Public Three Arrested
नागपूर : सिगारेट ओढणाऱ्या तरुणींना हटकणे युवकांचे जीवावर बेतले
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?

आणखी वाचा : “वा राजसाहेब वा, बऱ्याच काळाने…”, राज ठाकरेंच्या भाषणावर शरद पोंक्षेंची प्रतिक्रिया

जगभरात मुस्लिमांसोबत होणाऱ्या भेदभावावर उस्ताद अमजद अली खान यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर ९/११च्या हल्ल्यानंतर मुस्लिमांबद्दलचा लोकांचा दृष्टिकोन बदलला. त्यानंतर मिस्टर खान म्हणून परदेशात गेल्यावर माझी कसून तपासणी केली जायची. म्हणूनच जेव्हा माझ्या पत्नीने अमन आणि अयान या मुलांना जन्म दिला तेव्हा आमच्या पूर्वजांचे आडनाव म्हणजेच बंगश हे आडनाव आम्ही त्यांना दिले. आता जगभरातून कोणीही खान अमेरिकेत किंवा इतर कोठेही गेले, तर त्यांची अधिक तपासणी केली जाते. आमच्या बाबतीत असे काही फारसे घडले नसले तरी तेथील लोकांच्या मन:शांतीसाठी आम्ही सूटबूट घालतो.”

आणखी वाचा : बर्लिनमधील मुलाचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा व्हिडीओ शेअर करत अक्षय कुमार, म्हणाला “मोदीजी तुम्ही”

पुढे फक्त भारतात नाही तर संपूर्ण जगात होणाऱ्या या असहिष्णुतेवर उस्ताद अमजद म्हणाले, “हे फक्त भारतातचं नाही. माझे वडील म्हणाले होते की संपूर्ण जगाचा एकच ईश्वर आहे, एकच शक्ती आहे जी आपल्याला या जगात आणते आणि घेऊन जाते. मानवता हा एकच धर्म आहे. मला प्रत्येक धर्माशी जोडल्यासारखे वाटते. माझे प्रेक्षक सर्व धर्माचे आहेत, म्हणूनच मी संपूर्ण जगाच्या शांतीसाठी प्रार्थना करतो. रशिया आणि युक्रेन लढत आहेत याचे मला खूप दुःख झाले आहे. त्यामुळे महागाई खूप वाढली आहे आणि सरकार कोणाचेही असो, पण एकदा दर वाढले की ते कधीच खाली येत नाहीत.”

आणखी वाचा : प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा ते अक्षय कुमार…, सेलिब्रिटी ‘या’ साइड बिझनेसमधून कमावतात कोट्यावधी रुपये

उस्ताद अमजद अली खान भारतातील हिंदू आणि मुस्लिमांमधील वाढत्या दुराव्या विषयी म्हणाले, “आपण वेगवेगळ्या पक्षांचे आणि त्यांच्या विचारसरणीचे आहोत आणि आपण प्रेमळ असायलं हवं. कदाचित आपल्या शिक्षण व्यवस्थेत काही उणिवा असतील ज्या आपण सुधारल्या पाहिजेत, नाहीतर पीएचडी केलेला माणूस धर्माचा विचार न करता जातीयवादी कसा होतो ते सांगा. यामुळे आपण लोकांना प्रेमळ बनवायला हवे. जसा पाकिस्तान आहे, पूर्वी आपण एकच देश होतो पण फाळणी झाली. आता आपण शेजारी आहोत. जर दोन शेजारी एकमेकांना मदत करत नसतील तर केवळ एकमेकांचा नाश करण्याचा प्रयत्न तरी करू नका. संगीताला कोणताही धर्म नसतो आणि तेच आपल्याला एकत्र करू शकते.”