संगीतप्रेमी अमृता फडणवीस यांनी घेतली इंडियन आयडल विजेत्या पवनदीपची भेट

त्यांच्या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

amrita fadnavis, devendra fadanvis, pavandeep, indian idol 13 winner,
सध्या सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाले आहेत.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणजे ‘इंडियन आयडल.’ काही दिवसांपूर्वीच इंडियन आयडल १२ ची ग्रॅण्ड फिनाले पार पडली. पवनदीप राजनने इंडियन आयडल १२ची ट्रॉफी जिंकली. त्यानंतर आता पवनदीपने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर भेटीचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्यांनी, ‘इंडियन आयडल विजेते पवनदीप राजन आणि अरुणिता कांजिवाल यांनी माझ्या मुंबईतील निवासस्थानी भेट दिली, तेव्हा त्यांचे मन:पूर्वक स्वागत, अभिनंदन केले. हे दोघेही अतिशय चांगले गायक, कलावंत आहेत. त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या’ असे कॅप्शन दिले आहे.

आणखी वाचा : “मी रेसलिंग करतानाही अंतर्वस्त्र घालत नाही”; WWE मधील ‘या’ महिला खेळाडूचा अजब खुलासा

देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीनंतर त्यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये देवेंद्र फडणीवस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, पवनदीप राजन, अरुणिता कांजिवा आणि इतर काही लोक दिसत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Amrita fadnavis meets indian idol pavandeep in mumbai avb

ताज्या बातम्या