आलं अमृता फडणवीस यांचं नवं गाणं; काही तासांत मिळाले ४ लाख व्ह्यूज

महिला दिनाच्या निमित्ताने आलं अमृता फडणवीस यांचं विशेष गाणं

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस गेल्या काही काळात आपल्या गाण्यांमुळे जोरदार चर्चेत आहेत. कधी अमिताभ यांच्यासोबत गायलेलं गाणं तर कधी व्हॅलेंटाईन डे निमित्त गायलेलं गाणं. त्यांची गाणी रसिकांचे लक्ष वेधून घेतात. दरम्यान अमृता फडणवीस यांचे आणखी एक नवं गाणं रसिकांच्या भेटीस आलं आहे.

‘अलग मेरा ये रंग है’ असे या गाण्याचे बोल आहेत. आज महिला दिनाच्या निमित्ताने या गाण्याचा पहिला व्हिडीओ प्रदर्शित झाला आहे. अॅसिड हल्ल्यातील पीडित महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी या गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे.

सध्या हे गाणं सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत चार लाखांहून अधिक वेळा हे गाणे पाहिले गेले आहे. आतापर्यंत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Amruta fadnavis new song alag mera yeh rang hain mppg