राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सध्या त्यांच्या गाण्यामुळे चर्चेत आहेत. नुकतंच त्यांचं ‘मूड बना लिया’ हे गाणं प्रदर्शित झालं आहे. हे गाणं त्यांनी स्वतः गायलं असून या गाण्यामध्ये त्या डान्स करतानाही दिसत आहे. या गाण्याला एका दिवसातच दहा मिलियनपेक्षा अधिक व्ह्युज मिळाले आहेत. गाण्यानंतर आता त्या चित्रपटातही दिसणार का असा प्रश्न अनेकांना पडला होता. अखेर अमृता फडणवीस यांनी स्वतः याचं उत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमृता फडणवीस यांनी ‘लोकमत’ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांचे भविष्यातले प्लॅन्स सांगितले. तसंच त्या आगामी काळात चित्रपटात दिसणार की नाही हेही त्यांनी सांगितलं.

आणखी वाचा : “अचानक मोठी झाली यार…”; लेकीसाठी पोस्ट लिहीत स्वप्निल जोशी भावूक

आणखी वाचा : ‘मूड बना लिया’ गाण्यावर लेकीची प्रतिक्रिया काय होती? अमृता फडणवीस म्हणाल्या…

या मुलाखतीत त्यांना “गाण्यानंतर आता तुम्ही चित्रपटातही आम्हाला काम करताना दिसणार का?” असा प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना त्या म्हणाल्या, “चित्रपटात काम करण्याचा माझा काहीच विचार नाही. मी जे गाते त्यात मी माझ्या भावना ओतते आणि त्याच प्रकारे गाण्यात अभिनय करते, याचं मला समाधान आहे.”

हेही वाचा : “प्रत्येक लग्नात हे गाणं…” ‘मूड बना लिया’वर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया, गाण्याला एका दिवसांत मिळाले लाखो व्ह्युज

अमृता फडणवीस यांनी गायलेलं ‘मूड बना लिया’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या गाण्याला नेटकरी विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. काहीजण त्यांचं कौतुक करत आहेत तर काहींनी त्यांना ट्रोल केलं आहे. यापूर्वीही त्यांची काही गाणी प्रदर्शित झाली होती. ‘मूड बना लिया’प्रमाणेच ती गाणी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amruta fadnavis shared her future plans rnv
First published on: 08-01-2023 at 14:44 IST