scorecardresearch

“प्रत्येक लग्नात हे गाणं…” ‘मूड बना लिया’वर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया, गाण्याला एका दिवसांत मिळाले लाखो व्ह्युज

अमृता यांची काही गाणी याआधीही प्रदर्शित झाली आहेत. त्यांच्या या गाण्यांना सोशल मीडियावरही बराच प्रतिसाद मिळाला

“प्रत्येक लग्नात हे गाणं…” ‘मूड बना लिया’वर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया, गाण्याला एका दिवसांत मिळाले लाखो व्ह्युज
फोटो सौजन्य : लोकसत्ता

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना गाण्याची प्रचंड आवड आहे. हे त्यांच्या याआधी प्रदर्शित झालेल्या गाण्यांमधून दिसून आलं आहे. अमृता फडणवीस उत्तम गायिका आहेत. नुकतंच त्यांचं ‘मूड बना लिया’ हे गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्याचा लाँच सोहळा नुकताच पार पडला. यावेळी त्यांनी गाण्याबद्दलचे अनेक खुलासे केले.

टी सीरिजच्या युट्यूब चॅनलवर अमृता फडणवीस यांचं ‘मूड बना लिया’ हे गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्याचा प्रेक्षकांचा अधिकाधिक प्रतिसाद मिळत आहे. लाँच सोहळ्यात गाण्याबद्दल प्रश्न विचारताच अमृता फडणवीस म्हणाल्या, “हे गाणे बॅचलर अँथम म्हणता येईल. प्रत्येक लग्नात, लाउंजमध्ये वाजेल ज्या लोकांना रिलॅक्स व्हायचे आहे त्यांनी हे गाणे ऐका किंवा गाण्यावर डान्स कर एकदम फ्रेश व्हाल,” अशा शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी वाचा – उर्फी जावेद प्रकरणावर अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “तिला सांगा….”

‘मूड बना लिया’ या गाण्यातील अमृता यांच्या लूकची व हटके अंदाजाची चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच अमृता यांनी त्यांच्या या गाण्याची घोषणा सोशल मीडियावर केली होती. त्यानंतर या गाण्याचा टीझरही प्रदर्शित करण्यात आला होता. टीझरमध्ये अमृता यांच्या डान्सची झलक चाहत्यांना पाहायला मिळाली होती. मित ब्रोस यांनी गाण्याला संगीत दिल असून टी सिरीज यांनी गाण्याची प्रस्तुती केली आहे. गाण्याला १० मिलियनपेक्षा अधिक व्ह्युज मिळाले आहेत

आणखी वाचा – गाण्यानंतर आता अमृता फडणवीस दिसणार चित्रपटात? खुलासा करत म्हणाल्या…

अमृता यांची काही गाणी याआधीही प्रदर्शित झाली आहेत. त्यांच्या या गाण्यांना सोशल मीडियावरही बराच प्रतिसाद मिळाला. शिवाय त्यांना ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. ‘वो तेरे प्यार का गम’, ‘शिव तांडव स्रोतम’, ‘तेरी मेरी फिर से’, ‘बेटिया’ या त्यांच्या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-01-2023 at 17:51 IST

संबंधित बातम्या