राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियावर खूप सक्रीय आहेत. त्या विविध प्रकारच्या कार्यक्रमांना हजेरी लावतात. तसेच त्या अनेक मुद्द्यांवर त्यांचं मतंही मांडत असतात. अलीकडेच त्यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कायक्रमातील काही फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. MC Stan च्या कॉन्सर्टमध्ये शिव ठाकरेचीच हवा; सुंबूलबरोबर केला जबरदस्त डान्स, Video पाहिलात का? अमृता फडणवीसांना नेटकरी सातत्याने ट्रोल करत असतात. त्यांच्या या नव्या फोटोंनंतरही त्यांना ट्रोल केलं जात आहे. त्यांनी या कार्यक्रमात डिझायनर ड्रेस परिधान केला होता. काही दिवसांपूर्वी कुर्त्यावरून ट्रोल झालेल्या अमृता फडणवीस आता या ड्रेसमुळे ट्रोल होत आहेत. 'अमृता फडणवीस आता उर्फी जावेदचं मार्केट जाम करणार', अशा कमेंट्स नेटकरी करत आहेत. (नेटकऱ्यांनी अमृता फडणवीस यांच्या फोटोंवर केलेल्या कमेंट्स (फोटो - स्क्रीनशॉट) काहींनी त्यांची तुलना उर्फी जावेदशी केलीये, तर काहींनी 'फडणवीस साहेबांना शोभत नाही तुम्ही मॅडम' असं म्हटलंय. नेटकऱ्यांनी अमृता फडणवीस यांच्या फोटोंवर केलेल्या कमेंट्स (फोटो - स्क्रीनशॉट) काही नेटकऱ्यांनी तर त्यांना 'गरिबांची उर्फी जावेद' असं म्हटलंय. दुसरीकडे काही चाहत्यांनी मात्र अमृता फडणवीस सुंदर दिसत असल्याचं म्हटलं आहे.