मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचली आहे. ती आता लवकरच ‘२४’या हिंदी मालिकेतही दिसणार आहे.
गेल्याच वर्षी अमृताने पती हिमांशू सोबत नच बलिए हा रिअॅलिटी शो जिंकून सर्वांचे लक्ष वेधले. त्यासोबतच तिने आपण एक चांगली कलाकार असल्याचे ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटातून सर्वाना दाखवून दिले. या चित्रपटासाठी तिला ‘झी चित्रगौरव पुरस्कार २०१६’ सोहळ्यात ‘विशेष ज्युरी पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर आता ‘२४’ या मालिकेतील भूमिका तिच्या यशात आणखी भर घालेल यात शंकाच नाही. या मालिकेत अमृता एका राजकीय नेत्याच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. या मालिकेचे दिग्दर्शन अभिनय देव करणार असून याची निर्मिती अभिनेता अनिल कपूरची आहे. मार्च मध्ये सुरू होणारी ही मालिका काही कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली असून ती जून किंवा जुलैमध्ये सुरू होणार आहे.