‘खतरों के खिलाडी’मध्ये अमृता खानविलकर?

अमृताच्या इन्स्टाग्राम स्टोरीमुळे या चर्चांना दुजोरा मिळाला आहे

amruta khanvilkar
अमृता खानविलकर

छोट्या पडद्यावरील गाजलेला रिअॅलिटी शो म्हणजे ‘खतरों के खिलाडी.’ आत अधिक अॅक्शन स्टंटसह ‘खतरों के खिलाडी’ पुनरागमन करणार आहे. ‘खतरों के खिलाडी’ पर्व १० लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या पर्वामध्ये मराठ मोळी आणि सर्वांची लाडकी अभिनेत्री अमृता खानविलकर सहभागी होणार असल्याचे म्हटले जात आहे.

‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार अमृता खानविलकरची ‘खतरों के खिलाडी पर्व १०’साठी निवड करण्यात आल्याचे म्हटले आहे. या शोच्या सूत्रसंचालनाची धूरा पु्न्हा दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या खांद्यावर आहे. तसेच शोचे चित्रीकरण ऑगस्ट महिन्यात सुरु होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

नुकताच अमृताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिने चाहत्यांना ‘खतरों के खिलाडी पर्व १०’मध्ये सहभागी व्हावे की नाही असा प्रश्न विचारला आहे. तिने हो की नाही असे देखील पोस्ट केले आहे. तिच्या या पोस्टमुळे चर्चांना आणखी दुजोरा मिळाला आहे.

सध्या अमृता खानविलकर ‘स्टार प्रवाह’ वरील बहुचर्चित मालिका ‘जिवलगा’मध्ये काम करत आहे. या मालिकेद्वारे अमृता खानविलकर पहिल्यांदाच दैनंदिन मालिकेमध्ये अभिनय करत आहे. या मालिकेत अमृतासह अभिनेता स्वप्नील जोशी आणि ‘हँडसम हंक’ सिद्धार्थ चांदेकर हे दोघेदेखील दिसत आहेत. या दोघांनी बऱ्याच वर्षानंतर छोट्या पडद्यावर पुनरागम केले आहे. या तिन बड्या स्टार्सची जोडी मालिकेत पाहताना चाहत्यांना आनंद होत अल्याचे पाहायला मिळत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Amruta khanvilkar is going to be a part of khatron ke khiladi season 10 avb