आज आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशी म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येते ती ते पंढरपूरची वारी. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठलनामाचा गजर करतात. प्रत्येक व्यक्ती सोशलम मीडियावर फोटो किंवा व्हिडीओ शेअर करत एकमेकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देताना दिसते. आता मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री अमृता खानविलकरने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत सगळ्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अमृताने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत अमृताने काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. अमृताने ‘लय भारी’ या चित्रपटातील ‘माऊली माऊली’ या गाण्यावर डान्स केला आहे. अमृताचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. थोड्याच वेळात या व्हिडीओला ४७ हजार लोकांनी पाहिला आला आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा : ‘बाबा!!! आई आली’, रितेश- जेनेलियाचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल

आणखी वाचा : ..म्हणून शिल्पाने विकला बुर्ज खलिफामधील ५० कोटी रुपयांचा फ्लॅट

आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं. विशेष म्हणजे मनुष्याचं एक वर्ष म्हणजे देवांची एक अहोरात्र असते. त्यामुळे दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो असं मानलं जातं. आषाढ महिन्यात येणार्‍या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होतं आणि दक्षिणायन सुरू होते. म्हणून आषाढी एकादशीला ‘देवशयनी (देवांच्या निद्रेची) एकादशी’, असं म्हणतात. विशेष म्हणजे या काळात असूर प्रबळ होतात व मानवाला त्रास देऊ लागतात. त्यामुळेच या असूर शक्तींपासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी अनेक जण व्रतवैकल्य करत असतात. तसंच दररोजच्या देवपूजेसोबत श्रीविष्णूची `श्रीधर’ या नावाने पूजा केली जाते. सोबत अहोरात्र तुपाचा दिवा लावला जातो. विशेष म्हणजे या काळात विठ्ठल रुक्मिणीचीही पूजा केली जाते.