मलायकाला भररस्त्यात रोखणारे आजोबा झाले ट्रोल

मलायकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही चित्रपटसृष्टीपासून लांब असली तरी तिच्या फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. मलायका सध्या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय डान्स शो ‘सुपर डान्सर ४’ ची परिक्षक आहे. शिल्पा शेट्टीच्या कुटुंबाला करोना झाल्यानंतर मलायका शिल्पाच्या जागेवर आली आहे. दरम्यान, मलायका पुन्हा एकदा एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर वूमप्लाने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मलायका तिच्या श्वानला सकाळी फिरायला घेऊन जात असल्याचे दिसतं आहे. या दरम्यान, एक वृद्धी व्यक्ती मलायकाला थांबवतात आणि तिची स्तुती करु लागतात. “आम्ही तुझा डान्स शो पाहतो. आम्हाला तुझा डान्स शो खूप आवडतो. करोनाच्या काळात देखील त्यावर कोणता परिणाम होतं नाही आहे. ही एक उत्तम गोष्ट आहे. माझ्या शुभेच्छा तुझ्यासोबत आहेत. ईश्वर नेहमीच तुझ्यासोबत आहे,”असे ते म्हणतात.  त्यानंतर मलायका विनम्र पणे त्यांचे आभार मानते आणि त्यांचा निरोप घेते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

आणखी वाचा : Video : प्रँक करताना अनिता हसनंदानीने पतीच्या लगावली कानशिलात, सोशल मीडियावर झाली ट्रोल

मलायकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, ‘ती वृद्ध व्यक्ती मलायकावर लाइन मारत आहे.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘काका तुम्ही जे इशारे करत आहात ते काही बरोबर वाटतं नाही.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘म्हातारीला म्हातारा भेटला,’ अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी त्या आजोबांना ट्रोल केलं आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: An old uncle is giving compliments to malaika arora for her dance show super dancer 4 dcp

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन
ताज्या बातम्या