हिंदी चित्रपटसृष्टीने खऱ्या अर्थाने कलाविश्वाला एक अनोखी देणगी दिली असं म्हणायला हरकत नाही. मग ते अभिनेते असो, अभिनेत्री असो, संगीतकार असो किंवा गीतकार. या कलाविश्वात प्रत्येक विभागात योगदान देणाऱ्या या कलाकारांच्या गर्दीत एक असं नाव आहे ज्या व्यक्तीला त्यांच्या शब्दांमुळे एक वेगळी ओळख मिळाली. काळाला आव्हान देत पण, सध्याच्या काळाची कास न सोडता शब्दांच्या एका जादुगाराने अशी काही किमया केली, जी आजही प्रेक्षकांची मनं जिंकते. त्या गीतकाराचं नाव आहे, आनंद बक्शी. गायक होण्यासाठी म्हणून या झगमगाटाच्या दुनियेत आलेल्या आनंद बक्शी यांनी ‘चरस’ या चित्रपटात आपलं हे स्वप्नही साकार केलं. पण, त्यांच्या शब्दांनी जी किमया केली ती अद्वितीयच होती.
आज ते आपल्यात नसले, तरीही ‘दम मारो दम’पासून ‘यादे’पर्यंतचं प्रत्येक गीत आपल्या मनाचा ठाव घेतं. मुळात त्या काळातही आधुनिक आणि उडत्या चालीची गाणी ही आनंद बक्शी यांच्या लेखणीतून उतरली आहेत यावर अनेकांचा विश्वासही बसत नाही. पण, हे खरंच. त्यांच्या लेखणीतच मुळात आधुनिकतेची शाई होती, असं म्हणायला हरकत नाही. चला तर मग या गीतकाराच्या लेखणीतून उतरलेल्या अशाच काही अफलातून गीतांवर एक नजर टाकूया…




दम मारो दम, मिट जाए गम… (हरे रामा हरे क्रिष्णा)
ना ना करते प्यार तुम्हीसे… (जब जब फूल खिले)
सावन का महिना… (मिलन)
जाने जा ढुँढता फिर कहाँ… (जवानी दिवानी)
मेहबूबा मेहबूबा… (शोले)
ओम शांती ओम… (कर्ज)
आ देखे जरा… (रॉक)
ना जाने कहाँ से आयी है… (चालबाज)
जुम्मा चूम्मा दे दे… (हम)
रुक जा ओ दिल दिवाने… (दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे)