‘सूर्यवंशम’ हा चित्रपट आजही टीव्हीवर सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे. यात अमिताभ बच्चन यांची दुहेरी भूमिका साकारली होती. चित्रपटातील प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांवर आपली वेगळी छाप पाडली, पण एका छोट्या मुलाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. तो छोटा मुलगा म्हणजे अमिताभ बच्चन यांच्या नातवाच्या भूमिकेत झळकलेला तो बालकलाकार. त्याने सिनेमात आजोबा भानुप्रताप यांना खीर भरवली होती. या निरागस मुलाची भूमिका आनंद वर्धन याने साकारली होती. त्याचं पूर्ण नाव पी.बी.एस. आनंद वर्धन आहे. चित्रपटातील त्याने साकारलेली गोड भूमिका निरागसपणा प्रेक्षकांना खूप भावला होता. विशेषतः तो खीर खाऊ घालण्याचा सीन आजही लोकांच्या लक्षात आहे.

बऱ्याच वर्षांनंतर आनंद वर्धनचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लहानपणी अत्यंत गोड दिसणारा हा मुलगा आता मोठा झाला असून तो साऊथ फिल्म इंडस्ट्रीत अभिनेता म्हणून सक्रिय आहे. त्याचे आजोबा प्रसिद्ध गायक पी.बी. श्रीनिवास यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने अभिनयाची वाट धरली आणि आज तो एक स्टायलिश अभिनेता म्हणून ओळखला जातो.

या चित्रपटाला बरीच वर्षे झाली आहे. इतक्या वर्षांनंतर तो छोटा मुलगा आता पूर्णपणे बदलला आहे. आनंद वर्धन आता अत्यंत देखणा दिसतो. महत्त्वाचं म्हणजे तो या इंडस्ट्रीतच सक्रिय आहे. होय. आनंद वर्धन अभिनेता आहे. त्याचे ताजे फोटो पाहून चाहते थक्क झाले आहेत. हा तोच निरागस मुलगा आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. त्याचे ट्रान्सफॉर्मेशन एखाद्या चित्रपटातील कथेसारखे वाटते. आनंद वर्धन केवळने फक्त या एका चित्रपटातच काम केलं नाही, तर बालकलाकार म्हणून अनेक चित्रपटांत काम केलं आणि नंतर साऊथ फिल्म इंडस्ट्रीत स्वतःची ओळख निर्माण केली. मिळालेल्या माहितीनुसार, त्याने २० हून अधिक तेलगू चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याने आपल्या करिअरची सुरुवात ‘प्रियारागालू’ (Priyaragalu) या चित्रपटातून केली होती, नंतर त्याला ‘सूर्यवंशम’मध्ये काम करण्याची संधी मिळाली.

आनंद वर्धनची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि अभिनयाची ओढ

आनंद वर्धनची कौटुंबिक पार्श्वभूमी देखील खूप रंजक आहे. त्याचे आजोबा पी.बी. श्रीनिवास हे एक प्रसिद्ध गायक होते. त्यांनी तमिळ, तेलगू, कन्नड, मलयलम आणि हिंदी चित्रपटांत अनेक गाणी गायली आहेत. आपल्या कुटुंबातून कोणीतरी अभिनेता बनावं अशी त्यांची इच्छा होती आणि त्यांचा नातू आनंदने हे स्वप्न पूर्ण केलं. दरम्यानच्या काळात आनंद काही काळ फिल्म इंडस्ट्रीपासून दूर होता. एका मुलाखतीत त्याने सांगितलं होतं की, शिक्षणासाठी तो सुमारे १२ वर्षे अभिनयापासून दूर राहिला. थोडक्यात सांगायचे झाल्यास, ‘सूर्यवंशम’मधील तो छोटा मुलगा आज एक स्मार्ट आणि टॅलेंटेड अभिनेता बनला आहे.