Anant Ambani Radhika Merchant 2nd Pre-Wedding : मुकेश अंबानी व नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी जुलै महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहे. राधिका मर्चंट हिच्याबरोबर १२ जुलैला सात फेरे घेऊन अनंत आयुष्याचा नवा प्रवास सुरू करणार आहे. पण त्यापूर्वी अनंत-राधिकाचे दोन प्री-वेडिंग मोठ्या धुमधडाक्यात, जल्लोषात पार पडले. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात १ मार्च ते ३ मार्चला गुजरातमधील जामनगरमध्ये दोघांचा पहिला प्री-वेडिंग सोहळा पार पडला; ज्याची देशभरात नव्हे तर जगभरात चर्चा झाली. त्यानंतर नुकताच दुसरा प्री-वेडिंग सोहळा क्रूझवर झाला.

अनंत-राधिका दुसरा प्री-वेडिंग सोहळा विशेष चर्चेत राहिला. कारण हा सोहळा इटली ते फ्रान्स प्रवास करत झाला. २९ मेला सुरू झालेला हा प्री-वेडिंग सोहळा काल, १ जूनला संपला. त्यामुळे सध्या या सोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओ समोर येत आहेत. दुसऱ्या प्री-वेडिंगमधला अनंत-राधिकाचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे; जो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – Video: अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये जान्हवी कपूरने बॉयफ्रेंड शिखर पहारियाला भरवला घास, व्हिडीओ व्हायरल

या व्हिडीओमध्ये अंबानींची होणारी लाडकी सून राधिका मर्चंट गुलाबी रंगाच्या फ्रॉकमध्ये सुंदर दिसत आहे. तर अनंत प्रिंटेड शर्टमध्ये पाहायला मिळत आहे. दोघांच्या या लूकने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओत मुकेश व नीता अंबानी देखील आपल्या सूनेबरोबर पाहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ ‘अंबानी अपडेट’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा – “आपल्याकडे गोंधळाचं वातावरण…”, लोकसभा निवडणुकीच्या निकालावर आनंद इंगळेंचं भाष्य, म्हणाले, “भूमिका बदलणाऱ्यांना…”

पहिल्या प्री-वेडिंग सोहळ्यामध्ये काय-काय झालं होतं?

दरम्यान, अनंत-राधिकाच्या पहिल्या प्री-वेडिंग सोहळ्याच्या पहिल्या दिवशी, १ मार्चला जगप्रसिद्ध पॉप स्टार रिहानाचा परफॉर्मन्स झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संगीत सोहळा झाला. यामध्ये बॉलीवूडच्या सेलिब्रिटींनी जबरदस्त परफॉर्मन्स केला. बॉलीवूडचे तीन खान ‘नाटू नाटू’ या गाण्यावर डान्स करताना दिसले. तिसऱ्या दिवशी, ३ मार्चला ‘टस्कर ट्रेल्स’ आणि ‘हस्ताक्षर’ कार्यक्रम झाला. ‘टस्कर ट्रेल्स’ हा आउटडोअर कार्यक्रम होता. ज्याद्वारे पाहुण्यांना जामनगर, वनतारा फिरवलं. त्यानंतर रात्री भव्य महाआरती आणि अनंत-राधिका यांची हस्ताक्षर सेरेमनी पार पडली. या सोहळ्याला १२०० पाहुण्यांनी उपस्थितीत लावली होती. या प्री-वेडिंगमधील फोटो, व्हिडीओ अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होतं असतात.