Anant Ambani - Radhika Merchant Grah Shanti Puja Inside Video : अंबानींच्या घरच्या लग्नकार्याची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. अनंत अंबानी व राधिका मर्चंट आज ( १२ जुलै २०२४ ) लग्नबंधनात अडकणार आहेत. सध्या देश-विदेशातून अनेक सेलिब्रिटी या दोघांच्या लग्नासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. प्रियांका चोप्रा, किम कार्दशियन, युकेचे माजी पंतप्रधान बोरिस जॉनसन, सॅमसंग कंपनीचे मालक ली बायंग-चुल असे अनेक मान्यवर मुंबईत आले आहेत. तर, शाहरुख खान आपल्या सासूबाईंसह मुंबईत परतला आहे. या शाही विवाहसोहळ्याआधी अंबानींच्या राहत्या घरी गृहशांती पूजा करण्यात आली. या पूजेचा Inside व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल आहे. राधिकाने या गृहशांती पूजेसाठी पारंपरिक गुजराती लूक केल्याचं पाहायला मिळालं. लाल रंगाचा काठ असलेली सुंदर अशी साडी, मोकळ्या केसात गजरा, गळ्यात दागिने असा लूक राधिकाने गृहशांती पूजेसाठी केला होता. होणाऱ्या सूनेची नीता अंबानींनी सर्वांसमोर नजर काढली व तिचं मोठ्या प्रेमाने अंबानी कुटुंबात स्वागत केलं. राधिकाला नववधूच्या रुपात पाहून तिचे आई-वडील खूपच भावुक झाल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. यामध्ये राधिका तिच्या वडिलांना मिठी मारून रडत असल्याचं दिसत आहे. हेही वाचा : Video: अनंत-राधिकाच्या लग्नाला पाहुण्यांची सुरू झाली लगबग; प्रियांका चोप्रा, राम चरण आपल्या कुटुंबासह मुंबईत झाले दाखल अनंत-राधिकाची गृहशांती पूजा राधिका व अनंत यांनी एकमेकांना गळ्यात हार घालून सगळ्या कुटुंबीयांसमोर घट्ट मिठी मारली. आपला मुलगा अन् होणाऱ्या सुनेचं हे गोड नातं, त्यांचं प्रेम पाहून मुकेश अंबानी भावुक झाले होते. आपल्या मुलांनी सुखात राहावं अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. अगदी याचप्रमाणे मुकेश अंबानींच्या डोळ्यात देखील आनंदाश्रू तरळले होते. राधिका-अनंतच्या गृहशांती पूजेचा हा Inside व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी देखील लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. हे जोडपं आज विवाहबंधनात अडकणार आहे. या दोघांच्या लग्नासाठी बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. हेही वाचा : मराठमोळ्या अभिनेत्रीला अनंत-राधिकाच्या लग्नाचं खास आमंत्रण! व्हिडीओ शेअर दाखवली लग्नपत्रिकेची झलक, कोण आहे ती? दरम्यान, आलिया भट्ट, रणबीर कपूर, शाहरुख खान, सलमान खान, दीपिका पदुकोण, रणवीर सिंह, बच्चन कुटुंबीय, कपूर कुटुंबीया या सेलिब्रिटींशिवाय राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर आज या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.