Anant Ambani-Radhika Merchant Honeymoon : देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी १२ जुलैला लग्नबंधनात अडकला. एन्कोर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ वीरेन मर्चंट आणि उद्योजिक शैला मर्चंट यांची लाडकी मुलगी राधिका मर्चंट हिच्याशी अनंत अंबानीने लग्नगाठ बांधली. मुंबईतील नीता मुकेश अंबानी कन्व्हेन्शनल सेंटरमध्ये अनंत-राधिकाचा मोठा थाटामाटात लग्नसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्याला देश-विदेशातील दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती. अलीकडेच अनंत-राधिका पॅरिसमध्ये ऑलिम्पिक एन्जॉय करताना पाहायला मिळाले. त्यानंतर दोघांनी पॅरिसमधीलच आलिशान रिसॉर्ट हनिमूनसाठी निवडलं आहे. या रिसॉर्टचे वैशिष्ट्ये आणि किंमत काय आहे? जाणून घ्या… गेल्या कित्येक महिन्यांपासून अनंत अंबानी-राधिका मर्चंट ( Anant Ambani-Radhika Merchant ) यांच्या लग्नाची चर्चा सुरू होती. लग्नापूर्वी दोघांचे दोन प्री-वेडिंग सोहळे झाले. मार्च महिन्यात तीन दिवसांचा पहिला प्री-वेडिंग सोहळा गुजरात येथील जामनगरमध्ये पार पडला. त्यानंतर २९ मे ते १ जूनपर्यंत दुसरा प्री-वेडिंग सोहळा क्रूझवर झाला. इटली ते फ्रान्स असा प्रवास करत अनंत-राधिकाचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा झाला. हे दोन्ही प्री-वेडिंग सोहळे चांगलेच गाजले. अखेर १२ जुलैला अनंत-राधिकाने लग्नबंधनात अडकून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. माहितीनुसार, आता पॅरिसच्या कोस्टा रिकाच्या रिसॉर्टमध्ये अनंत-राधिका हनिमूनसाठी थांबले आहेत. हेही वाचा - Video: काका अयान मुखर्जीच्या मांडीवर आरामात बसलेली दिसली रणबीर-आलियाची लाडकी लेक, नेटकरी म्हणाले, “क्यूटी पाई राहा” Anant Ambani-Radhika Merchant गुरुवारी, १ ऑगस्टला अनंत-राधिका ( Anant Ambani-Radhika Merchant ) कोस्टा रिकामध्ये पोहोचले. यावेळी त्यांनी हनिमूनसाठी सुरम्या गुआनाकास्ट येथील कासा लास ओलासमधील एका आलिशान रिसॉर्टची निवड केली. हे रिसॉर्ट आलिशान सुविधा व वातावरणासाठी खूप प्रसिद्ध आहे. या रिसॉर्टमध्ये प्रति रात्र किंमत ३० हजार डॉलर म्हणजेच २५ लाख रुपये आहे. हेही वाचा - Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने पायावर काढला नवा टॅटू, पाहा व्हिडीओ कासा लास ओलासच्या प्रीता खाडीच्या जवळ हे रिसॉर्ट आहे. या रिसॉर्टमधून दूरपर्यंत फक्त मोकळी जागा, ताडाची झाडं आणि अंगण पाहायला मिळतं. या रिसॉर्टच्या बेडरूममधून समुद्रकिनारा दिसतो. याशिवाय रिसॉर्टमध्ये एक अत्याधुनिक मीडिया रूम आहे. तसंच आउटडोअरसाठी देखील खास सुविधा आहेत. ज्यामध्ये १०० फूटचा एक जबरदस्त पूल आहे. अनंत-राधिकाची प्रेमकहाणी ( Anant Ambani-Radhika Merchant Love Story ) दरम्यान, अनंत-राधिकाच्या ( Anant Ambani-Radhika Merchant ) प्रेमकहाणीबद्दल बोलायचं झालं तर, दोघं लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते. दोघं एकत्रच मोठे झाले. त्यामुळेच लहापणापासूनच दोघांची चांगली मैत्री होती. याच मैत्रीचं रुपांतर हळूहळू प्रेमात झालं. पण त्यानंतर दोघांनी लगेच आपल्या नात्याचा खुलासा माध्यमांसमोर केला नाही. २०१८मध्ये पहिल्यांदा अनंत-राधिकाचा रोमँटिक फोटो समोर आला होता. त्यानंतर दोघं अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसू लागले. २०२०मध्ये करोना काळात अनंत-राधिका जामनगरमध्ये अडकले होते. त्यावेळेस राधिकाने अनंतवर प्रेम करत असल्याचा खुलासा केला होता. अनंतने देखील आपल्या प्रेमाची अनेकदा कबुली दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे अनंतच्या आजारपणात राधिकाने नेहमी त्याची साथ दिली. त्यामुळे अनंत पत्नी राधिकाला आपली ताकद मानतो आणि स्वतः नशीबवान असल्याचं सांगतो.